शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 मराठी, ऑनलाइन अर्ज

Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2024 | महाराष्ट्र शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी | शरद पवार ग्राम समृद्धी योजना फॉर्म | शरद पवार ग्रामसमृद्धी | शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR | गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र | शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज

 

केंद्र सरकार आणि राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न्चा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवीत आहे. आता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे ती म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्याचा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2022 रोजी आला आणि त्यानंतर हि योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यासाठी सुरुवात झालेली आहे.

तर मग चला मित्रांनो आज आपण या महत्वपूर्ण शरद पवार ग्राम समृद्धी योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि योजनेमध्ये अर्ज कसा करावा, या योजनेचे लाभ काय आहे? या योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी, कागदपत्रे ,पात्रता इत्यादी सर्व गोष्टींची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना संपूर्ण माहिती मराठी

शरद पवार ग्राम समृद्धी योजना : ही योजना 12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाला सुरू करण्यात आली आहे. हि योजना शरद पवार यांच्या जन्म तारखेला सन्मानित करण्यासाठी त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर शासन निर्णयानुसार राज्यात 3 फेब्रुवारी 2021 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2024 च्या माध्यमातून गावांचा आणि शेतकऱ्यांचा विकास करून त्यांना या योजनेअंतर्गत रोजगारही उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी भेट म्हणून हि योजना सुरू करण्यात आली आहे. रोजगार हमी विभाग ही योजना राबवणार असून मनरेगा रोजगारही शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेशी जोडला जाईल. या योजनेमुळे शेतकरी आणि गावांना त्यांची अर्थव्यवस्था विकसित होण्यास मदत होईल. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2024 च्या कामकाजासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 771188 रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या योजनेंतर्गत गाई-म्हशींसाठी गोशाळा (गोठा) तसेच शेळ्या-मेंढ्यांसाठी शेड, कुक्कुटपालन शेड बांधण्यात येणार आहे. यासोबतच गुरांचे मूत्र आणि शेण साठवून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 मराठी, ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र शरद पवार ग्राम समृद्धी योजना Highlights

योजनेचे नाव शरद पवार ग्राम समृद्धी योजना
कोणा व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी
उद्देश्य शेतकऱ्यांना जनावरांची शेड बांधून देऊन समृध्द बनविणे व ग्रामीण भागांचा विकास करणे
विभाग रोजगार हमी विभाग, महाराष्ट्र सरकार
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

 

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना 

महाराष्ट्र शरद पवार ग्राम समृद्धी योजना महत्वाचे मुद्दे

 • महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) च्या संयुक्त विद्यमाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला.
 • शरद पवार ग्राम समृद्धी योजना ‘मी समृद्ध, माझे गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी वैयक्तिक लाभाच्या चार योजना राबविण्यात येतील.
 • त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता कायमस्वरूपी शेड बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
 • 2024 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने ही योजना प्रत्येक ग्रामपंचायती आणि त्यातील गावांना कामाच्या माध्यमातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना उद्देश

 • ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश सर्व राज्यांतील शेतकरी आणि ग्रामीण भागाचा विकास करणे हा आहे.
 • शेतकऱ्यांच्या जनावरांचे उष्णता, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
 • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून गावाची अर्थव्यवस्था सुधारेल. महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकरी स्वावलंबी होऊन त्याला रोजगारही मिळणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकरी सक्षम होतील.
 • महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना हि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोगाने संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामात रोजगाराच्या संधी मिळाव्यात, ज्यामुळे तेथील लोकांना आणि तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल आणि गावांमधून होणारे स्थलांतर थांबवता येईल.
 • राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त आणि स्वावलंबी बनविणे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये

 • शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे शेड बांधण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिली जाते.
 • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून मिळणारी अनुदानाची रक्कम डीबीटीच्या मदतीने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
 • योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यास तसेच त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

मागेल त्याला शेततळे अनुदान योजना

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना लाभार्थी पात्रता व अटी 

 • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
 • या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच घेता येणार आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागपत्रे त्याचबरोबर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
 • केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने यापूर्वी सुरू केलेल्या एकाद्या योजनेंतर्गत शेतकऱ्याने गायी, म्हशी, शेळ्यांसाठी शेड बांधली असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे महत्वपूर्ण घटक

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाई, म्हशी,शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

 • गाय व म्हैस यांच्यासाठी गोठा बांधणे
 • शेळी पालना साठी शेड बांधणे
 • कुक्कुट पालन साठी शेड बांधणे
 • भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाय व म्हशी यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे

ग्रामीण भागामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जनावरांच्या गोठयाची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड असते तसेच जनावरांच्या पायामध्ये शेण व मूत्र पडलेले असते तसेच पावसाळ्यामध्ये जनावरांच्या पायामध्ये अत्यंत दलदलीचे स्वरूप निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये जनावरे बसत असल्यामुळे ते विविध प्रकारच्या आजारांना बळी पडतात. तसेच जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी बांधलेल्या नसतात. त्यांच्यापुढील मोकळया जागेवरच चारा टाकला जातो. या चाऱ्यावर बऱ्याचवेळा शेण व मूत्र पडल्याने जनावरे चारा खात नाही व हा चारा वाया जातो. या सर्व बाबींचे व्यवस्थापन आणि संबंधित नुकसान टाळण्यासाठी व जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाण बांधणे आवश्यक आहे.

योजनेच्या माध्यमातून आवश्यक सुधारणा :

जनावरांच्या गोठ्याचे नियोजनबद्ध नसल्यामुळे पायातील शेण व मूत्र वाया जाते, जनावरांचे शेण व मूत्र हे एक उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत आहे. त्यामुळे शेडमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण चा वापर करून पक्क्या स्वरूपात सपाटीकरण करून, जनावरांपासून मिळणारे खत गोठ्या शेजारी खड्ड्यांमध्ये एकत्र जमा करून ते शेतीसाठी वापरून शेताची उत्पन्न वाढवता येऊ शकते.

योजनेंतर्गत मिळणारी अनुमती :

 • 6 गुरंकारिता 95 चौ.मी. जमीन पुरेशी आहे.
 • तसेच त्याची लांबी 7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असेल
 • तर गव्हाण साठी जमीन 7 मीटर असावी.
 • 250 लिटर क्षमतेचे मूत्र साठवण्यासाठी टाकी बांधण्यात यावी.
 • जनावरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय करण्यासाठी 200 लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात यावी.

योजनेअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे.

 • अकुशल खर्च – 6,188/- रुपये  (प्रमाण 8 टक्के )
 • कुशल खर्च – रु.71,000/- रुपये (प्रमाण 92 टक्के )
 • एकूण – 77,188/- रुपये (प्रमाण 100 टक्के )

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेळी पालन शेड बांधणे

शेळीपालन हे ग्रामीण भागातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी उदरनिर्वाहाचे पारंपरिक साधन आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती शेळ्या व मेंढ्यांचे पालन करतात, शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु शेळ्यांसाठी व मेंढ्यांसाठी निवारा असलेला आपल्याला सहजा पाहायला मिळत नाही. त्यामुळेच योग्य निवारा नसल्याकारणाने शेळ्या-मेंढ्या संसर्गजन्य आजार संपर्कात येतात. तसेच शेळी-मेंढीचे शेण आणि मूत्र यापासून तयार होणारे  चांगल्या दर्जाची सेंद्रिय खते शेड नसल्यामुळे नष्ट होतात. या सर्व बाबींचे व्यवस्थापन आणि संबंधित नुकसान टाळण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांसाठी चांगल्या दर्जाचे शेड बांधल्यास या जनावरांचे आरोग्यही चांगले राहते व सेंद्रिय खत सुद्धा मिळते.

योजनेच्या माध्यमातून आवश्यक सुधारणा :

पक्क्या स्वरुपाची शेड  नसल्याने, ग्रामीण भागामध्ये शेळया – मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया व मूत्र यापासून तयार होणा-या उत्कृष्ट्ठ दर्जाच्या सेंद्रीय खतांचा, नाश होतो. शेळया – मेंढयाकरिता चांगल्या व पक्क्या स्वरुपाची शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहील तसेच वाया जाणारे मल, मूत्र एकत्र करुन त्यापासून शेतीसाठी उत्कृष्ट्ठ दर्जाचे सेंद्रीय खत मिळवता येईल. यामुळे शेतीच्या सुपिकतेबरोबर शेती उत्पादनवर चांगला परीणाम होऊ शकेल.

योजनेंतर्गत मिळणारी अनुमती :

 • 10 शेळयांकरिता 50 चौ.मी. निवारा तसेच त्याची लांबी 3.75 मी. आणि रुंदी 2.0 मी.असावी.
 • चारही भिंतीची सरासरी उंची 20 मी. असावी.
 • छतासाठी लोखंडी पत्रे किंवा सिमेंट पत्रे वापरण्यात यावेत,
 • तळासाठी मुरुम टाकण्यात यावा. शेळयांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधण्यात यावी.

योजनेअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे.

 • अकुशल खर्च – 4,284/- रुपये (प्रमाण 8 टक्के )
 • कुशल खर्च – 45,000/- रुपये  (प्रमाण 92 टक्के )
 • एकूण – 49,284/- रुपये (प्रमाण 100 टक्के )

शेळीपालनाच्या शेडसाठी प्रत्येकि 10 शेळयांसाठी एक गट समजण्यात येईल व त्याप्रमाणे निर्णयानुसार अनुदान निश्चित करण्यात येईल तसेच, ज्या लाभार्थ्याकडे 10 पेक्षा अधीक शेळया असतील त्यांना शेळयांसाठीचे दोन गट लक्षात घेवून दोन पट अनुदान राहील. मात्र एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळयांकरिता 3 पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधणे 

शेतकरी कुटुंबामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी कुक्कुटपालन करतो, परंतु पक्षांचे संगोपन करण्यासाठी व ऊन वारा पाऊस तसेच परभक्षी जनावरे यासारख्या गोष्टीमधून पक्षांना व्यवस्थितपणे संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्याकडे चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यासाठी कुक्कूटपक्षांचे उन, पाऊस, परभक्षी जनावरे व येणा-या साथीच्या आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. चांगल्या निवा-यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिलांचे व अंड्यांचे परभक्षी प्राण्यांपासून सरंक्षण होण्यास मदत होईल.

योजनेंतर्गत मिळणारी अनुमती :

 • 100 पक्षांकरिता 50 चौरस मीटर. निवारा आणि त्याची लांबी 3.75 मीटर तर रुंदी 2.0 मी. असेल.
 • कुक्कूट जाळीला छतापर्यंत 30 सेमी X 30 सेमीची असावी.तर भिंत सरासरी 20 मीटर उंचीची असावी.

योजनेअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे.

 • अकुशल खर्च – 4,760/- रुपये (प्रमाण 10 टक्के )
 • कुशल – 45,000/- रुपये (प्रमाण 90 टक्के )
 • एकूण – 49,760/- रुपये (प्रमाण 100 टक्के )

पक्षांची व्यवस्था करणे :

शासन निर्णयानुसार 100 पक्षांकारिता अनुदान निश्चित केले गेले  आहे. मात्र, यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करावयाचे आहे. परंतु, 100 पेक्षा अधीक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामिनदारांसह कुक्कुटपालन शेडची मागणी करावी व त्यानुसार संबंधित यंत्रणेने संबंधित लाभार्थ्यास शेड मंजूर करावे व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतरच्या 1 महिन्याच्या कालावधीत कुक्कुटपालन शेडमध्ये 100 पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक असेल.

घरेलू कामगारांसाठी सन्मान धन योजना

किशोरी शक्ती योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग

नाडेप कंपोस्टिंग अंतर्गत 3.6 मीटर X 1.5 मीटर X 0.9 मीटर. मोठ्या भूखंडावर बांधकाम करण्यात यावे, त्यापासून सुमारे 90 दिवसांत अंदाजे 2.00 टन कंपोस्ट खत तयार होणे अपेक्षित आहे. हे खत 0.25 हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसे आहे शेतातील वनस्पतीच्या टाकाऊ भागापासून सेंद्रिय खत तयार करून ते पुन्हा शेतात टाकणे त्यामुळे जमिन भुसभुशीत राहण्यास मदत होते.

भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग प्रक्रिया:

नाडेपचे बांधकाम पूर्ण झाल्यावर, त्यात सेंद्रीय पदार्थ/कचरा, शेण माती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. कचरा पहिल्या थरात तळाशी ठेवला जातो, जो जवळपास 6 इंच उंचीचा असतो.  125 ते 150 लिटर पाण्यात चार किलो गायीचे शेण मिसळून पहिल्या थरावर टाकावे. यानंतर दुस-या थराच्या स्वच्छ माती पहिल्या थरातील कच-याच्या निम्मे  दुस-या थरावर पसरावी.या प्रकारे नाडेप टाकीच्या वर एकावर एक थर 1.5 फुटांपर्यंत रचून ढीग तयार करण्यात यावा, त्यानंतर ढिगाचा वरचा थर 3 इंचाचे शेण व मातीच्या मिश्रणाने बंद करवा. त्यानंतर 2 ते 3 महिन्यात  काळपट, भुसभूशीत, ओलसर आणि दुर्गंध वीरहीत कंपोस्ट खत तयार होते.

योजनेंतर्गत अनुमती:-

 • अकुशल खर्च – 4,046/- रुपये (प्रमाण 38 टक्के )
 • कुशल खर्च – 6,491/- रुपये (प्रमाण 62 टक्के )
 • एकूण – 10,537/- रुपये (प्रमाण 100 टक्के )

शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत मिळणारे फायदे    

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खालील प्रमाणे लाभ मिळणार आहे.

 • या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना, गायी, म्हशी, शेळ्यासाठी शेड बांधण्यात येणार आहेत.
 • जे शेतकरी शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून कुक्कुट पालन व्यवसाय करावयाचा असल्यास शासनातर्फे त्यांना अनुदान देण्यात येईल.
 • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळणे सुरु होईल.
 • ही योजना मनरेगाशी जोडली गेली असल्यामुळे त्यामध्ये मनरेगाद्वारे पुरविलेल्या कामांचा समावेश केला जाईल.
 • 2024 पर्यंत शेतकरी आणि शेत मजुरांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली जाणार आहे.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
 • रेशनकार्ड
 • उत्पन्नाचा दाखला
 • रहिवाशी दाखला
 • जातीचा दाखला
 • जन्माचा दाखला
 • अर्जदाराचे मतदार कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मोबाईल नंबर
 • सात बारा / नमुना 8 अ उतारा
 • शासनाच्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत या पूर्वी पशुपालनाचा वापर न करण्याबाबत घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र असणे आवश्यक.

 कन्यादान योजना महाराष्ट्र 

मुख्यमंत्री वयोश्री योजना

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

 • अर्जदार शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी अर्ज करावा.
 • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी जसे कि मोबाइल क्रमांक, आपले नाव, जिल्हा, तालुका, पत्ता तसेच तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे, त्या कामासाठी योग्य चौकटीत खूण करा, नाडेप कंपोस्टिंग, गाई-म्हशींच्या शेडचे काँक्रिटीकरण, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड इत्यादी माहिती अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरल्यानंतर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडून अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा.
 • ग्रामपंचायत मध्ये तो फॉर्म जमा केल्यानंतर अर्जदाराला त्याची पावती दिली जाते ती सांभाळून ठेवावी.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2024 FAQ

प्रश्न : शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना काय आहे ?

उत्तर : शरद पवार ग्राम समृद्धी या योजनेद्वारे शेळी, कुक्कुटपालन आणि गाई-म्हशी पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. ज्यामध्ये गायी व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळी पालनासाठी शेड बांधणे, कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे, भु-संजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान दिले जाते.

प्रश्न : शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?

उत्तर : गायी आणि म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपये अनुदान दिले जाते. सहा पेक्षा जास्त गुरांसाठी सहा च्या पटीत, म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाईल.

शेळीपालन शेड बांधण्यासाठी 10 शेळ्यांसाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाते.20 शेळ्यांसाठी दुप्पट अनुदान आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते

कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी 100 पक्ष्यांसाठी शेड बांधायचे असल्यास 49,760 रुपये अनुदान दिले जाते.150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुप्पट अनुदान दिला जाईल. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसतील तर 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन नॉमिनी सह शेडची मागणी करता येईल. मात्र मंजुरी नंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक असेल.

भु-संजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाते.

प्रश्न : शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेसाठी किती प्रमाणात अनुदान मिळते.?

उत्तर : गाय व म्हशीसाठी गोठा बांधण्यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाते.

शासनाच्या इतर योजना :

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना