SBI स्त्री शक्ती योजना 2023 मराठी : SBI स्त्री शक्ती योजना ऑनलाइन अर्ज

SBI Business Loan for Women | एसबीआय स्त्री शक्ती योजना 2023 | SBI Stree Shakti Yojana 2023 In Marathi | SBI स्त्री शक्ती योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता | Stree Shakti Scheme 2023 | स्त्री शक्ती पॅकेज योजना | SBI stree shakti scheme

 

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि समाजात त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत.असाच एक नवीन उपक्रम सरकारने महिलांनसाठी सुरु केला आहे ज्याचे नाव आहे स्त्री शक्ती योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि समाजातील आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र सरकारने SBI स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे.

या योजनेद्वारे ज्या महिलांना स्वत:चा व्यवसाय करायचा आहे, त्यांना स्त्रीशक्ती योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.स्टेट बँक ऑफ इंडिया महिलांना अत्यंत कमी व्याजदराने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते.जेणेकरुन महिलांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सहज सुरु करता येईल.सर्व इच्छुक महिला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सहजपणे कर्ज करू शकतात.

तर मग चला मित्रानो आपण या लेखात SBI स्त्री शक्ती योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहू. स्त्री शक्ती योजना काय आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे,, या योजनेसाठी लागणारी पात्रता, ऑनलाइन नोंदणी, ऑफलाइन अर्ज, इत्यादी माहिती पाहणार आहोत. तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

SBI स्त्री शक्ती योजना 2023 माहिती मराठी

केंद्र सरकारने सुरु केलेल्या SBI स्त्री शक्ती योजनेतून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकतात.भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने केंद्र सरकार कडून देशातील महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत स्त्री शक्ती योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज अत्यंत कमी व्याजदराने दिले जाते.

जर एखाद्या महिलेला SBI स्त्री शक्ती योजनेंतर्गत कर्ज घ्यायचे असेल, तर तिची व्यवसायात किमान 50% किंवा त्याहून अधिक भागीदारी असली पाहिजे. तरच ती या योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करू शकते. स्त्री शक्ती योजनेंतर्गत महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही. या योजनेचा लाभ घेऊन महिला उद्योग क्षेत्रात प्रगती करू शकतील.

महिलांना त्यांचा सध्याचा व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खास तयार केली आहे.

SBI स्त्री शक्ती योजना 2023 मराठी : SBI स्त्री शक्ती योजना ऑनलाइन अर्ज

SBI स्त्री शक्ती योजना Highlights

योजनेचे नाव SBI स्त्री शक्ती योजना
व्दारा सुरु केंद्र सरकार (एसबीआय बँकेच्या मदतीने)
लाभार्थी देशातील महिला ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे
लाभ कमी व्याजावर कर्ज मिळेल
उद्देश्य देशातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे
विभाग SBI
श्रेणी केंद्र सरकारी योजना

 

फ्री सिलाई मशीन योजना

महिला सम्मान बचत पत्र योजना

SBI स्त्री शक्ती योजना उद्देश्य

 • देशातील महिलांना स्वावलंबी बनवणे हा SBI स्त्री शक्ती योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • केंद्र सरकारने सुरु केलेल्या SBI स्त्री शक्ती योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI बँकेकडून 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
 • कर्ज मिळवून महिला त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील आणि स्वावलंबी होऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील.
 • योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि याशिवाय समाजातील महिलांची आर्थिक स्तरही सुधारेल.

स्त्री शक्ती योजनेंतर्गत समाविष्ट असलेले व्यवसाय 

सदर योजनेत समाविष्ट असलेले व्यवसाय खालिलप्रमाणे

 • दुग्ध व्यवसाय,
 • शेती उत्पादने
 • कपडा क्षेत्र
 • घरगुती उत्पादने
 • पापड बनवण्याचा व्यवसाय
 • कुटीर उद्योग जसे की मसाले किंवा अगरबत्ती निर्मिती व्यवसाय
 • कॉस्मेटिक वस्तू किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय

SBI स्त्री शक्ती योजना अंतर्गत कर्जाची रक्कम

स्त्री शक्ती योजना कर्ज तपशील खालील प्रमाणे.

 • किरकोळ व्यापारी: रु. 50000 ते रु. 2 लाख
 • व्यवसाय उपक्रम : रु. 50000 ते रु. 2 लाख
 • व्यावसायिक : रु. 50000 ते 25 लाख रुपये
 • SSI : रु. 50000 ते रु. 25 लाख

सुकन्या समृद्धि योजना

लेक लाडकी योजना माहिती

SBI स्त्री शक्ती योजना व्याजदर किती आहे ?

वैयक्तिक श्रेणींसाठी लागू असलेले मार्जिन 5% ने कमी केले जाईल. तसेच कर्ज घेतलेल्या रकमेनुसार व्याजदर बदलतात.

जर एखाद्या महिलेने या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कर्ज घेतले असेल तर त्या महिलेला त्यासाठी 0.5% कमी व्याज द्यावे लागेल.

SBI स्त्री शक्ती कर्ज योजनेचे फायदे

 • SBI बँक महिलांना स्त्री शक्ती योजनेअंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते.
 • SBI स्त्री शक्ती योजनेअंतर्गत पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
 • महिलांना हे कर्ज वेगवेगळ्या श्रेणींमध्ये लागू असल्यास मार्जिन 5% वरून कमी करण्यात येईल.
 • जर एखाद्या महिलेने या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कर्ज घेतले असेल तर त्या महिलेला त्यासाठी 5% कमी व्याज द्यावे लागेल.
 • व्यवसाय कर्जाची रक्कम हि 5 लाख रुपये असेल, तर तुम्हाला त्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही.
 • या योजनेअंतर्गत खेळते भांडवल सुविधेसाठी सवलतीच्या मार्जिनसाठी व्याज दर 4% प्रतिवर्ष ठेवण्यात आलेला आहे.
 • स्त्री शक्ती योजनेंतर्गत MSME मध्ये नोंदणीकृत कंपन्यांना 50 हजार ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
 • या योजनेच्या मदतीने ग्रामीण भागात लघुउद्योग करणाऱ्या महिलांना आपला व्यवसाय मोठा करता येणार आहे.

SBI स्त्री शक्ती योजना 2023 अंतर्गत पात्रता

 • या योजनेंतर्गत व्यवसाय कर्ज मिळविण्यासाठी महिला मूळची भारतीय असणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत फक्त महिलाच अर्ज करण्यास पात्र असतील.
 • जर एखाद्या महिलेकडे व्यवसायात 50% किंवा त्याहून अधिक मालकी हक्क असेल तर ती कर्जासाठी अर्ज करू शकते.
 • डॉक्टर, सीए, वास्तुविशारद यांसारख्या नोकरदार सेवांमध्ये काम करणाऱ्या महिलाही या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यास पात्र असतील.
 • हे कर्ज किरकोळ व्यवसाय सेवा प्रदात्यासारख्या लहान व्यवसाय युनिटसाठी देखील या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ प्रदान केला जातो.

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

SBI स्त्री शक्ती योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • अर्जदाराचे ओळखपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • कंपनी मालकीचे प्रमाणपत्र
 • अर्ज
 • कंपनी भागीदार असल्यास बँक स्टेटमेंट आणि त्याची आवश्यक कागदपत्रे
 • मागील 2 वर्षांचा ITR
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो
 • पुराव्यासह व्यवसाय योजना नफा आणि तोटा विवरण

SBI स्त्री शक्ती योजना 2023 अंतर्गत अर्ज कसा करावा

How To Apply For SBI Stree Shakti Yojana 2023

 • SBI स्त्री शक्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जावे लागेल.
 • तुम्हाला या कर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती कर्मचाऱ्याकडून मिळवायची आहे.
 • यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज दिला जाईल.
 • या अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल.
 • अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज बँक कर्मचार्‍याकडे जमा करावा लागेल.
 • तुमच्या अर्जाची पडताळणी बँक अधिकाऱ्याकडून केली जाईल.
 • यानंतर तुमचे कर्ज मंजूर झाल्यास, त्या कर्जाची रक्कम 24 ते 48 तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

अशा प्रकारे तुम्ही SBI स्त्री शक्ती योजना 2023 अंतर्गत अर्ज करू शकता.

SBI स्त्री शक्ती योजना FAQ

प्रश्न :  SBI स्त्री शक्ती योजना काय आहे?

उत्तर : केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू केली. ज्यामध्ये देशातील महिलांना स्त्री शक्ती पॅकेज योजनेतून कमी व्याजदरात २५ लाख पर्यंत कर्ज दिले जाते. स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकता.

प्रश्न : स्त्री शक्ती योजनेचा अर्ज कोठे मिळेल ?

उत्तर : स्त्री शक्ती योजनेचा अर्ज फक्त आपल्या जवळच्या स्टेट बँकेच्या शाखे मध्येच मिळेल.

प्रश्न : SBI स्त्री शक्ती योजनेत किती कर्ज उपलब्ध आहे?

उत्तर : केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने सुरु केलेल्या  स्त्री शक्ती पॅकेज योजने अंतर्गत महिलांना जास्तीत जास्त 25  लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज मिळते. यामध्ये बँकेने निकष लावले आहेत. कर्ज घेणाऱ्या महिलेची त्या संबंधित व्यवसायात किमान 50 % मालकी असणे आवश्यक आहे.

 

शासनाच्या इतर योजना :

थेट कर्ज योजना महाराष्ट्र : समाज कल्याण योजना

299/399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना

विकलांग पेन्शन योजना 2023