सन्मान धन योजना मराठी : घरेलू कामगारांना मिळणार 10000 रुपये

Sanman Dhan Yojana 2024 | घरेलू कामगारांसाठी सन्मान धन योजना | Kamgar Sanman Dhan Yojana | महाराष्ट्र कामगार सन्मान धन योजना | सन्मान धन योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती | महिलांना 10 हजार रुपये मिळणार असा करा अर्ज

 

महाराष्ट्र सरकारने घरकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला/पुरुष कामगांसाठी एक योजना सुरु केली आहे ज्याचे नाव आहे, सन्मान धन योजना. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाकडून दरवर्षी 10 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तर मग चला मित्रांनो जाणून घेऊया कि सन्मान धन योजना काय आहे? पात्रता काय आहे ? GR तसेच या योजनेशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

सन्मान धन योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी

महाराष्ट्र राज्यात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची संख्या जास्त आहे.त्यामुळे आजही असे अनेक कुटुंबे आहेत ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे अशा कुटुंबातील महिला / पुरुष आपला उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम करतात. तसेच त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची,त्यां च्या संगोपनाची जबाबदारी असते त्यामुळे ते अत्यंत कमी पगारात कोणाच्या तरी घरी धुणीभांडी, जेवण बनविणे, साफसफाई अशी घरकामे करतात. परंतु त्यांना कमी पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करणे शक्य होत नाही त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने घरगुती कामगारांसाठी कामगार सन्मान धन योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाकडून दरवर्षी 31 डिसेंबर ला ज्या जीवित नोंदणीकृत कामगारांना 55 वर्ष पूर्ण झाले आहेत, अशा पात्र कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डिबीटीव्दारे जमा करण्यात येईल.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम, 2008 च्या कलम 11 मध्ये “वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील,” अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे. तरी शासन निर्णय व कामगार विभाग, दिनांक 8 ऑगस्ट 2014 दि. 05.01.2023 व दि. 25.03.2023 अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरुपात सन्मान धन योजना, २०२२ राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जिवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन्मान धन योजना मराठी : घरेलू कामगारांना मिळणार 10000 रुपये

महाराष्ट्र सन्मान धन योजना Highlights

योजनेचे नाव सन्मान धन योजना
कोणा द्वारे सुरू महाराष्ट्र शासन
योजनेचे लाभार्थी राज्यातील घरेलू कामगार वर्ग
योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब घरेलू कामगारांना गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी या अनुषंगाने ही योजना सरकारने सुरू केली आहे
योजनेचा लाभ लाभार्थी कामगारांना १० हजार रुपये आर्थिक सहाय्य

किशोरी शक्ती योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

सन्मान धन योजनेचा उद्देश

 • घरकाम करणाऱ्या कामगारांचा (महिला / पुरुष ) सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • कामगारांचे जीवनमान सुधारणे.
 • घरेलू कामगारांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणासाठी काही प्रमाणात मदत करणे.

सन्मान धन योजना 2024 साठी नियम व अटी

 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी यापूर्वी कामगाराने सन्मानधन योजनेचा लाभ घेतलेला नसावा. असल्यास ते कामगार अपात्र ठरतील.
 • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना देण्यात येणार आहे.

सन्मान धन योजना शासन निर्णय (GR)

 • लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ देण्यापूर्वी, लाभार्थी हा जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची खात्री विकास आयुक्त कार्यालयाकडून करण्यात येईल.
 • अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ हे कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करतील. त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम 15 (3) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखाना देखील तंतोतंत लागू असेल. याचा उल्लेख करावा.
 • सदर अर्थसहाय्याचे वाटप Sanman Dhan Yojana जलदगतीने होण्याच्या दृष्टीकोनातुन व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुख (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांच्या मार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येईल.
 • महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत केला जाईल.
 • वरील कार्यपध्दतीप्रमाणे आर्थिक साहाय्य वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्याकडे असेल.
 • आर्थिक लाभाचे वाटप करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन,त्यानंतर सदर कार्यवाही पूर्ण करून खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त कार्यालयाने शासनास दार तीन महिन्याने सादर करावा.

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना

सन्मान धन योजना FAQ

प्रश्न : सन्मान धन योजना वय मर्यादा काय आहे ?

उत्तर : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कल्याण कामगार अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची पूर्तता हि 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अश्या घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे.

प्रश्न : सन्मान धन योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

उत्तर : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना,सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपये एवढी रक्कम महाराष्ट्र घरेलू कल्याण कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून लाभार्त्याच्या थेट बॅंक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करण्यात येईल

प्रश्न : सन्मान धन योजनेत किती रुपये मिळणार ?

उत्तर : वयाची 55 वर्ष पूर्ण केली आहेत अशा पात्र घरेलू कामगारांना 10,000 रुपये एवढी रक्कम प्रतिवर्षी दिली जाणार आहे.

GR DOWNLOAD HERE 

शासनाच्या इतर योजना :

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 

लखपति दीदी योजना माहिती