फ्री शौचालय योजना 2024 मराठी | Free Toilet Yojana Maharashtra

Free Toilet Yojana 2024 Online Form | ग्रामीण शौचालय योजना | प्रधानमंत्री शौचालय योजना | शौचालय योजना ऑनलाईन फॉर्म | मोफत शौचालय योजना लिस्ट | फ्री शौचालय योजना 2024 संपूर्ण माहिती | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र | सरकार शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये देणार | फ्री शौचालय योजना ग्रामीण

 

देशात स्वच्छता निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकार विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते. त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव स्वच्छ भारत मिशन योजना आहे. या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम आयोजित केला आहे. तो म्हणजे फ्री शौचालय योजना.

फ्री शौचालय योजने अंतर्गत, प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्याला चालना देण्यासाठी मोहिमेबद्दल जागरूकता वाढवली जात आहे. तर मग चला मित्रांनो आपण या लेखात फ्री शौचालय योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहू. जसे कि फ्री शौचालय योजनेसाठी लागणारी पात्रता, उद्दिष्टे, कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी, ऑफलाइन अर्ज, इत्यादी माहिती पाहणार आहोत. तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

फ्री शौचालय योजना संपूर्ण माहिती मराठी

फ्री शौचालय अनुदान योजना हि केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (SBM) अंतर्गत 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास कुटुंबांना फ्री शौचालय योजनेच्या सहाय्याने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. फ्री शौचालय योजना हि केंद्र आणि राज्य सरकार च्या विद्यमाने राबविण्यात असल्याकारणाने आर्थिक अनुदान राशी हि 2 टप्प्यात देण्यात येते. म्हणजे केंद्र सरकार चा 75% आणि राज्य शासनाचा 25% असा सहभाग आहे .

सर्व ग्रामीण कुटुंबांना शौचालये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (SBM) लाँच करण्यात आले होते. मात्र या मिशनसह, सरकारचे हे लक्ष्य वाढत गेले आणि आतापर्यंत देशभरात सुमारे 10.9 कोटी वैयक्तिक शौचालये बांधली गेली आहेत.

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

Free Toilet Yojana 2024 Highlights

योजनेचे नाव फ्री शौचालय योजना
कोणा व्दारा सुरु केंद्र सरकार
लाभार्थी देशातील गरीब कुटुंबे
उद्देश्य शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे
लाभ 12,000/- रुपये
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन
अधिकृत वेबसाइट swachhbharatmission.gov.in

 

फ्री शौचालय योजना 2024 मराठी | Free Toilet Yojana Maharashtra

फ्री शौचालय योजनेचे उद्दिष्ट

 • प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे त्याचबरोबर येथील लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्याला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या आरोग्याची पातळीही सुधारेल आणि देशातील नागरिक स्वावलंबी आणि सक्षम होतील.
 • ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई होण्यापासून व पसरण्यापासून रोखणे.
 • नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन ग्रामीण भागातील कुटुंबांचे राहणीमान सुधारणे.

फ्री शौचालय अनुदान योजना वैशिष्ट्य

 • फ्री शौचालय योजनेची सुरुवात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहाय्याने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (SBM) अंतर्गत 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आली आहे.
 • ज्या घरांमध्ये अद्याप शौचालये नाहीत, अशा घरांमध्ये शौचालय बांधण्यासाठी आता या मोहिमेचा कालावधी 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
 • आतापर्यंत देशभरात सुमारे 9 कोटी वैयक्तिक घरगुती शौचालये बांधली गेली आहेत.
 • शौचालय अनुदान योजना हि केंद्र तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

फ्री शौचालय योजनेचे फायदे

 • फ्री शौचालय योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास 12000 /- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
 • मोफत शौचालय योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खुल्यावर शौचास बसण्याची प्रथा पूर्णपणे बंद होण्यास मदत होईल.
 • महिलांना खुल्यावर शौचास बसण्याची गरज भासणार नाही.
 • फ्री शौचालय योजनेच्या सहाय्यामुळे परिसरात रोगराई तसेच दुर्गंधी पसरणार नाही.
 • या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या दिशेने मदत मिळेल शिवाय स्वच्छतेमुळे त्यांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारेल.
 • फ्री शौचालय योजनेमुळे ग्रामीण विकासाला गती मिळेल.

शौचालय अनुदान योजनेच्या अटी व शर्ती

 • फक्त आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • ज्या कुटुंबांकडे आधीपासून शौचालय आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • शबरी घरकुल योजना आणि रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
 • शौचालयच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी हि लाभार्थी कुटुंबाची असेल देखभालीसाठी शासनाकडून कुठल्याच प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.

शौचालय योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड (BPL)
 • उत्पन्नाचा दाखला
 • वयाचा पुरावा
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट साईज फोटो
 • बँक खात्याचा तपशील

299/399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना

फ्री शौचालय योजनेसाठी कोण पात्र आहे?

पात्र कुटूंबासाठी IHHL च्या बांधकामासाठी 12000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.

 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब (BPL)
 • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती कुटुंब
 • लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंब
 • शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे
 • कुटुंबातील प्रमुख स्त्रिया
 • घर असलेले भूमिहीन मजूर

शौचालय योजनेअंतर्गत ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

 • अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
 • त्यानंतर शौचालय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तेथून अर्ज प्राप्त करावा लागेल.
 • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल. सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
 • यानंतर तुम्हाला हा फॉर्म संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
 • त्यानंतर ग्रामपंचायतीद्वारे तुमच्या अर्जाची तसेच कागदपत्रांची छाननी करून तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.

अशा प्रकारे तुमची फ्री शौचालय योजनेअंतर्गत ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

शौचालय योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

 • फ्री शौचालय योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अधिकृत वेबसाइटच्या यावे लागेल.
 • नंतर Citizen Registration या पर्याय क्लिक करावे लागेल,क्लिक केल्यानंतर, एक नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
 • आता तुम्हाला हा रजिस्ट्रेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागेल जसे कि अर्जदाराचा स्वतःचा मोबाईल नंबर, नाव,पत्ता,राज्य,कॅप्टचा कोड ई. टाकून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
 • ज्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल तो टाकून पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
 • पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, त्याचा डॅशबोर्ड तुमच्या समोर उघडेल तेथे तुम्हाला New Application हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावे लागेल.
 • क्लिक केल्यानंतर एक नवीन अर्ज तुमच्यासमोर उघडेल, त्या अर्जामध्ये लागणारी सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
 • त्यानंतर आवश्यक आसणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
 • हि प्रोसेस योग्य प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. ज्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती मिळेल जी तुम्हाला प्रिंट करून सेव्ह करून ठेवायची आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

शौचालय अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्जाची स्थिती बघण्याची पद्धत

 • अर्जदाराला सर्व प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
 • त्यानंतर होम पेज वर login बटनावर क्लिक करून Login करायचे आहे.
 • आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यात View Application या बटनावर क्लिक करायचं आहे.
 • त्यानंतर अर्ज क्रमांक टाकून तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या स्क्रीन वर दिसेल.

फ्री शौचालय योजना 2024 FAQ

प्रश्न : शौचालयासाठी सरकार किती अनुदान देते?

उत्तर : फ्री शौचालय योजनेंतर्गत सरकारकडून 12,000 रुपयांची आर्थिक मदत शौचालय बांधण्यासाठी दिली जाते.

प्रश्न : फ्री शौचालय योजना काय आहे?

उत्तर : देशातील गरीब कुटुंबांकडे त्यांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, यासाठी त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. अशा गरीब कुटुंबांच्या समस्या लक्षात घेऊन आणि स्वच्छता व्यवस्थेचा विचार करून स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत,देशातील सर्व गरीब कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते यामध्ये केंद्र सरकारचा 75% सहभाग (9000/- रुपये) व राज्य शासनाचा 25% (3000/- रुपये) सहभाग असतो.

प्रश्न : फ्री शौचालय योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर : फ्री शौचालय योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

शासनाच्या इतर योजना :

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना