राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ऑनलाइन अर्ज : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 2023

Rajarshi Shahu Maharaj Scholarship | महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना । राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना । राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन अर्ज । राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना मराठी | Rajarshi Shahu Maharaj Scholarship In Marathi

महाराष्ट्र सरकार राज्यातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आर्थिक मदत म्हणून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. राज्यातील बहुतांश कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाहीत आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलांचे शिक्षण देखील पूर्ण करू शकत नाहीत. विध्यार्थ्यांना पैशा अभावी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केली.

मित्रांनो आम्ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात देत आहोत. जसे कि शिष्यवृत्ती योजना लाभ किती आहे? योजनेच्या अटी? योजनेची पात्रता,कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी. त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा. तसेच तुमच्या शाळेतील  किंवा आजूबाजूच्या परिसरातील 10 वी च्या परीक्षेत 75 % किंवा त्याहून अधिक टक्के  मिळवून उत्तीर्ण होऊन 11वी आणि 12वी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी/विद्यार्थींनी असतील  तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचा लेख त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना माहिती मराठी

राज्यातील आर्थिकदृष्टया गरीब व अनुसूचित जाती प्रवर्गातील विध्यार्थ्यांना पैशा अभावी स्वतःचे शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी, तरुणांचा कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. कौशल्य विकास करण्यासाठी शिक्षणाची खूप गरज आहे.

या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी तसेच त्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत त्यासाठी या राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती रचना जीवनाच्या सर्व स्तरांतील पात्र आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना मागासवर्गीय व गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने लागू केली आहे. हि शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील ओपन कॅटेगिरी मधील  विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक वरदान ठरत आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज गुणवत्तेच्या आधारावर विचारात घेतले जातील. त्यापैकी 48% मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा त्यांच्या एकूण गुणवत्तेनुसार विचार केला जाईल आणि उर्वरित 52% विद्यार्थ्यांचा विचार त्या त्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीच्या आधारे शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाईल.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ऑनलाइन अर्ज : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 2023

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना Highlights

योजनेचे नाव छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
राज्य महाराष्ट्र
उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
लाभ 300/- रुपये प्रतिमहिना
लाभार्थी इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

 

राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6000/- रुपये ते 16000/- रुपयांपर्यंत सरकार कडून आर्थिक सहाय्य दिले जाते. वाचा : सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश

 • राज्यातील आर्थिकदृष्टया गरीब आणि अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • राज्यातील आर्थिकदृष्टया गरीब आणि अनुसूचित जाती,जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे.
 • पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज भासू नये.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ

 • विद्यार्थ्याला दरमहा 300/- रुपये प्रमाणे 10 महिने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
 • या योजनेच्या आर्थिक मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी आवड निर्माण होईल व ते पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
 • विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्ग मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे ते सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • शिक्षणामुळे राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना लाभाचे स्वरूप

 • राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थ्याला 10 वी मध्ये 75 टक्के किंवा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
 • विद्यार्थ्याला दरमहा 300/- रुपये प्रमाणे 10 महिने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
इयत्ता       शिष्यवृत्ती रक्कम कालावधी एकूण रक्कम
11 वी 300/- रुपये दरमहा 10 महिने 3000 रुपये
12 वी 300/- रुपये दरमहा 10 महिने 3000 रुपये

 

10वी 12वी विद्यार्थ्यांना मिळणार 15000 ते 25000 रुपये वाचा : डॉ अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना पात्रता

 • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
 • विध्यार्थी अनुसूचित जातीच्या वर्गातील असावा.
 • विद्यार्थी 11वी किंवा 12वी इयेत्ते मध्ये शिकणारा असावा.
 • विद्यार्थ्यांनी 10वी मध्ये 75 टक्के आणि त्याहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
 • शिष्यवृत्तीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत अटी व शर्ती

 • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खुली असेल.
 • केवळ अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्तीत उत्पन्नाची कोणतीही अट असणार नाही फक्त गुणवत्ता हाच निकष असेल.
 • विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभ विहित केलेल्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येणार असून त्यापैकी 48 टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार (मागासवर्ग प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्याची एकत्रित गुणवत्ता विचारात घेऊन) आणि उर्वरित 52 टक्के गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्या त्या प्रवर्गासाठी शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार शिष्यवृत्ती लाभ देण्यात येणार आहे.
 • पात्र विद्यार्थ्यांचे वय पदवी अभ्यासक्रमासाठी 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 • अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची किमान 50% उपस्थिती असणे आवश्यक आहे.
 • एका कुटुंबातील फक्त दोन मुलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
 • अर्जदाराने केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • कोर्स कालावधी दरम्यान, अभ्यासक्रमामध्ये 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त अंतर नसावे.
 • विद्यार्थ्यांला गैरवर्तन/नैतिकता/परीक्षेतील गैरव्यवहार इ. कारणांसाठी शिक्षा होऊ नये.असल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेकडून अशा विद्यार्थ्याची शुल्क शिष्यवृत्ती थांबविण्यात किंवा रद्द करण्यात येईल.

मुलींचे आरोग्य, शिक्षण तसेच मुलीचे लग्न आणि मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य. वाचा : सुकन्या समृद्धी योजना 

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • विद्यार्थ्यांची इयत्ता 10वी ची उत्तीर्ण गुणपत्रिका
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्याची प्रत (पावती )
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

 • या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाइटला https://mahadbt.maharashtra.gov.in भेट द्या.
 • यानंतर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
 • यांनतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे.
 • माहिती संपूर्ण भरून झाल्यावर Register या बटनावर क्लिक करावे.
 • अशा प्रकारे तुमची राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती मधील ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना FAQ

प्रश्न : शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?

उत्तर : अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा तसेच तो विद्यार्थी 11वी किंवा 12वी इयेत्ते मध्ये शिकणारा असावा.

प्रश्न : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना उद्देश काय आहे?

उत्तर : गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.

प्रश्न : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती किती आहे?

उत्तर : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला दरमहा 300/- रुपये प्रमाणे 10 महिने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

महिला सन्मान बचत योजना

आयुष्मान भारत योजना

आंतरजातीय विवाह योजना

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना