प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 मराठी | PradhanMantri Matru Vandana Yojana Maharashtra

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2024 |  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती मराठी | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फॉर्म PDF | प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना महाराष्ट्र | मातृ वंदना योजना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन (PMMVY) | PMMVY Online Application Form | पीएम गर्भावस्था सहायता योजना | Pradhan Mantri Matru Vandana Yojana Maharashtra

 

आपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते त्यामुळे अशा महिलांना त्या गर्भवती असताना सुद्धा स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते.आणि त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषक आहार मिळत नाही परिणामी गर्भवती माता कुपोषित राहिल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम गर्भात असणाऱ्या नवजात बालकाच्या आरोग्यावर होतो. गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच महिला गर्भावस्थेत असतांना उत्तम पोषण व आराम मिळावा व त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने आर्थिक सहाय्यता म्हणून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ची सुरवात संपूर्ण देशात सरू केली आहे.

चला तर मित्रांनो, आज आपण या महत्वपूर्ण योजनेसंबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसे कि या योजनेची उद्दिष्टे,पात्रता, ऑफलाईन किंवा ऑनलाइन अर्ज, योजनेंतर्गत नोंदणी, योजनेचा लाभ इत्यादी. माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 संपूर्ण माहिती

आपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते त्यामुळे अशा स्त्रिया गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत घरकाम करतात. तसेच बाळाच्या जन्मानंतर त्या लगेच कामाला लागतात. परिणामी गर्भवती माता कुपोषित राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची कार्यक्षमता कमी होते.त्यामुळे नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे गर्भवती मातेचा व त्यांच्या पोटात असलेल्या बालकाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. तसेच  बाळ जन्माला आल्यावर हि बाळाच्या स्तनपानाच्या क्षमतेवर परिणाम होतो.

या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे व स्तनपान मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्याना सकस पोषण आहार घेण्यास प्रोत्साहित करून जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे त्याचप्रमाणे गर्भवती माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ची सुरवात संपूर्ण देशात केली.

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना व स्तनपान मातांना 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांच्या आत गर्भधारणेच्या तारखेची नोंदणी केल्यानंतर 1000, त्यानंतर गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर एक प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण केल्यानंतर 2000, आणि तिसरा हप्ता 2000 रुपये  मुलाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस-बी सह लसीकरणाचा डोस झाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात. यानंतर गर्भवती महिला जेव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळेस जननी सुरक्षा योजनेअंतर्गत उर्वरित 1,000/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नवीन अपडेट (Latest update)

केंद्र सरकारने गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार आता या योजनेंतर्गत पहिल्या अपत्याला 5 हजार रुपये शासनाकडून देण्यात येत होते. पण आता आनंदाची गोष्ट अशी आहे की दुसरे मूल जर मुलगी असले तर, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत सरकारकडून प्रोत्साहन म्हणून 6,000 रुपये दिले जातील.या योजनेंतर्गत दुसरे अपत्य मुलगी झाली तरच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व मिशन शक्ती अंतर्गत उपयोजना क्षमतेच्या माध्यमातून हे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप चौधरी यांनी सांगितले. योजनेअंतर्गत काही अंशत: बदल देखील करण्यात आले आहेत, जे आता PMMVY आवृत्ती 2.0 म्हणून ओळखले जाईल. या योजनेत अंशत: बदलही करण्यात आले आहेत. जी आता PMMVY लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. मुलाच्या जन्मापासून 270 दिवसांच्या आत लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करता येते. गर्भवती महिलांना आता खासगी रुग्णालयांमध्येही या योजनेचा लाभ दिला जाणार असून. त्यासाठी खासगी रुग्णालयांमध्येही पहिल्यांदाच माता झालेल्या महिलांना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2024 चा लाभ देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. यासाठी आता खासगी रुग्णालयात येणाऱ्या गरोदर महिलांना या योजनेसाठी प्रथम कोणत्याही शासकीय रुग्णालयात नोंदणी करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 मराठी | PradhanMantri Matru Vandana Yojana Maharashtra

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 Highlights

योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
कोणा व्दारा सुरु माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी
लाभार्थी देशातील गर्भवती महिला आणि

स्तनपान करणाऱ्या माता

लाभ 6000/- रुपये
उद्देश्य गर्भवती महिलांच्या आरोग्याची देखभाल आणि त्यांच्या पोषणासाठी आर्थिक सहाय्य
विभाग महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन/ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट https://wcd.nice.in

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना उद्देश

 • गर्भवती महिलांना आर्थिक मदत आणि योग्य सुविधा देऊन नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाचा मुख्य उद्देश आहे.
 • गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातेला तिच्या वेतनाची नुकसान भरपाई देणे जेणेकरून बाळाच्या प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल.
 • गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी

महिला सन्मान बचत योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वैशिष्ट्ये

 • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आली ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे.
 • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असेल.
 • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
 • या योजनेमुळे गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारण्यास व त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थी

 • 1 जानेवारी 2017 नंतर राज्यात पहिल्या मुलासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेसाठी पात्र असतील.
 • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील महिलांना घेता येईल.
 • एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला असेल किंवा मृत बाळ जन्माला आले असेल अशा परिस्थितीत देखील त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये नियमित नोकरीं करत असलेल्या गरोदर व स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक साहाय्य

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना या योजनेचा लाभ होईल. त्यांना दिली जाणारी आर्थिक मदत हि आई आणि तिच्या पहिल्या बाळाची देखभाल करण्यासाठी आहे. त्यामुळे मातृ वंदना योजनेअंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस 3 हप्त्यांमध्ये 6,000/- रुपये इतकी रक्कम मिळेल.हि रक्कम लाभार्थी महिलेच्या थेट बँक खात्यात  डीबीटीद्वारे जमा केली जाईल.

 • पहिला हप्ता: रु.1000 गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळी
 • दुसरा हप्ता: रु.2000 जर लाभार्थी गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करून घेत असेल.
 • तिसरा हप्ता: रु.2000, जेव्हा मुलाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस-बी सह लसींचे पहिले चक्र सुरू होते.
 • आणि आई जेव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळेस जननी सुरक्षा योजनेअंतर्गत उर्वरित 1,000/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना

विधवा पेन्शन योजना माहिती

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत मिळणारे फायदे

 • दारिद्र रेषेखालील कामगार वर्गातील गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गरोदरपणात त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत आणि पैशांच्या कमतरतेमुळे ते त्यांच्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत.
 • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 अंतर्गत, ₹ 6000 चा लाभ थेट गर्भवती महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.
 • या योजनेच्या सहाय्यामुळे गर्भवती महिलांना पोषक आहार मिळण्यास मदत होईल त्यामुळे जन्माला येणारे बाळ हे कुपोषित जन्माला येणार नाही. जन्मानंतर त्याची चांगली काळजी घेऊ शकतील.
 • गर्भवती महिला आणि बाळाचे प्रसूती दरम्यान होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
 • या योजनेमुळे गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • 1 जानेवारी 2017 किंवा त्या नंतर गर्भधारणा केलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल.
 • या योजनेंतर्गत 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या महिलांनाही पात्र मानले जाईल.
 • लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळवण्यास पात्र असेल.
 • पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान गर्भवती मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिलेला भविष्यात कोणतीही गर्भधारणा झाल्यास उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असेल.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नियम व अटी

 • फक्त भारतातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे वय किमान 19 वर्षे असावे.
 • एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व रजा दिली जात असेल तर अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
 • पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूतीदरम्यान गर्भवती मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिलेला भविष्यातील कोणत्याही गर्भधारणेच्या बाबतीत उर्वरित हप्त्यांचा दावा करण्याचा हक्क असेल.

लखपति दीदी योजना 2024

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आवश्यक कागदपत्रे

 • महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड
 • रेशन कार्ड
 • आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • माता बाळ संरक्षण कार्ड (MCP कार्ड)
 • मोबाईल नंबर

लाभ घेण्यास खालीलप्रमाणे टप्यानुसार कागदपत्रांची आवश्यकता असेल.

 • फॉर्म 1A भरून त्या अर्जा सोबत माता व बालसंरक्षण प्रमाणपत्र (MCP कार्ड ) व बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.
 • लाभाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) केल्याचे फॉर्म 1B माता आणि बाल संरक्षण प्रमाणपत्रावर (MCP कार्ड) नोंदवणे आवश्यक आहे.
 • लाभाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी, जन्म नोंदणी प्रमाणपत्राची फॉर्म 1C प्रत आणि बाळाच्या लसीकरणाचा पहिला डोस दिल्याची नोंद माता आणि बाल संरक्षण प्रमाणपत्र (MCP कार्ड) सादर करणे आवश्यक आहे.
 • सदर फॉर्म अंगणवाडी केंद्र / मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेकडून मोफत मिळतील.तसेच लाभार्थीकडे आधार कार्ड/बँक खाते/पोस्ट खाते नसल्यास, अंगणवाडी सेविका/एएनएम हे कार्ड आणि खाते मिळविण्यात मदत करतील.

मातृ वंदना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संपर्क

ग्रामीण क्षेत्र: एएनएम पात्र लाभार्थींना विहित नमुना  1A  चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेलव गट अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे सादर केले जातील. हा अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य केंद्र सहाय्यकाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तालुका अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करतील. लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती तालुका अधिकाऱ्यांमार्फत विहित संकेतस्थळावर भरली जाईल. राज्यस्तरावरून संगणकीय प्रणालीद्वारे लाभ अदा करण्यात येईल .

नगरपालिका क्षेत्र: प्राथमिक आरोग्य केंद्र, पात्र लाभार्थ्यांना विहित नमुना फॉर्म 1A देऊन पूर्ण केलेला अर्ज स्वीकारेल. पूर्ण केलेला अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यअधिकाऱ्याकडे  पाठविण्यात येईल. त्यानंतर आरोग्य पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहितीची पडताळणी करतील आणि अर्ज मुख्यअधिकाऱ्याकडे सादर करतील. मुख्यअधिकारी लाभार्थी महिलेच्या अर्जाचा तपशील विहित वेबसाइटवर भरतील.

महानगरपालिका क्षेत्र: मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्र सहाय्यक पात्र लाभार्थी महिलेला विहित नमुना फॉर्म 1A देऊन पूर्ण भरलेला अर्ज स्वीकारतील. भरलेला अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमंग ॲप सुरु करण्यात आले आहे

महिलांना चांगल्या आरोग्य सुविधासाठी तसेच आर्थिक विकासाठी नवनवीन योजना राबविण्यात येतात आणि या सर्व योजनांचे लाभ संपूर्ण देशातील महिलांनापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जातात. सर्व योजनांचे महत्व लक्षात घेऊन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने उमंग ॲप जारी केले आहे.  या ॲपद्वारे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत स्व-नोंदणी करता येते. या ॲपद्वारे केवळ प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गतच नाही तर आयुष्मान भारत योजनेंतर्गतही अर्ज करता येतो. याशिवाय विविध शासकीय योजनांचे लाभही या योजनेतून मिळू शकतात. अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनीलकुमार शर्मा यांनी दिली.

अस्मिता योजना | अस्मिता योजना कार्ड

शबरी घरकुल योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत ऑफलाईन नोंदणी

 • मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या पात्र महिलांनी जिल्यातील स्वयंसेविका, अंगणवाडी केंद्र (AWC), आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुका आरोग्य-अधिकारी कार्यालयात योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • नोंदणीसाठी अर्ज फॉर्म 1-A, पूर्णपणे सर्व बाबतीत, संबंधित कागदपत्रांसह तिच्या पतीने दिलेले हमीपत्र/संमती, इ . अंगणवाडी सेविका आरोग्य-अधिकारी कार्यालयात फॉर्म सबमिट करा.
 • लाभार्थ्याने रेकॉर्ड आणि भविष्यातील संदर्भासाठी अंगणवाडी सेविका / आशा/ एएनएम आरोग्य-अधिकारी कार्यालयाकडून पोचपावती घ्यावी.
 • विहित फॉर्म AWC/मान्यताप्राप्त आरोग्य सुविधेतून मोफत मिळू शकतात. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवरून (http://wcd.nic.in) देखील फॉर्म डाउनलोड केले जाऊ शकतात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?

 • पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • यानंतर होम पेजवर, तुम्ही मागितलेली माहिती जसे की: ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड बॅक ऑफिस लॉगिन फॉर्ममध्ये भरा.
 • आता दिलेल्या लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा अर्ज उघडेल.
 • अर्ज करताना अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरुन अर्ज सबमिट करावा.
 • अशा प्रकारे तुमची मातृ वंदना योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2024 हेल्पलाईन नंबर 

हेल्पलाईन क्रमांक :104

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 FAQ

प्रश्न : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना म्हणजे काय?

उत्तर : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला व तिच्या मुलाची काळजी घेण्यासाठी सरकार त्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे, जी तीन टप्प्यात दिली जाते .

पहिला हप्ता रु.1000 गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळी, दुसरा हप्ता रु.2000 जर लाभार्थी गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करून घेत असेल. तिसरा हप्ता रु.2000, जेव्हा मुलाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस-बी सह लसींचे पहिले चक्र सुरू होते. आणि आई जेव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळेस जननी सुरक्षा योजनेअंतर्गत उर्वरित 1,000/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.

प्रश्न : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठी साठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

प्रश्न : योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे ?

उत्तर : गर्भवती महिलांचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे आणि गर्भधारणा हि 1 जानेवारी 2017  नंतर झाली पाहिजे.

शासनाच्या इतर योजना :

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

डॉ अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

थेट कर्ज योजना महाराष्ट्र