प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 मराठी | स्ट्रीट व्हेंडरची आत्मनिर्भर निधी

PM Swanidhi Yojana In Marathi | स्ट्रीट व्हेंडरची आत्मनिर्भर निधी योजना | प्रधानमंत्री स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन | पीएम स्वनिधी योजना | प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 | Pradhan Mantri Svanidhi Yojana | 50,000 साठी स्वनिधी योजना काय आहे? | काय आहे पीएम स्वानिधी योजना?

 

कोविड-19 आजारामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकाच्या जीवनात, विशेषतः पथ विक्रेत्यांसारख्या लहान भांडवलावर उपजिवीकाकारणारांवर विपरित परिणाम झाला. या सर्व बाबींचा विचार करून पीएम स्वनिधी योजनेची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 जून 2020 रोजी केली. ही एक सूक्ष्म कर्ज योजना आहे. ज्यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुलभ हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करून घेणे हा आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना 10 हजार रुपये, 20 हजार रुपये आणि 50 हजार रुपये अशा तीन हप्त्यांमध्ये परवडणारी कर्ज  मिळणार आहे. या योजनेचा लाभ हा पथ विक्रेते, भाज्या विक्रेते, फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे छोटे दुकानदार यांना होणार आहे.

तर मग चला मित्रांनो आपण या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसंबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे कि अर्ज प्रक्रिया, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, योजनेशी संबंधित कागदपत्रे,सबसिडी इत्यादी. माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना संपूर्ण माहिती मराठी

आपल्या देशात सुशिक्षित युवा बेरोजगारांची संख्या लक्षणीय आहे. आजची तरुण पिढी शिक्षित आहे परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीच्या संधी तुलनेने कमी आहेत. त्यानंतर कोविड-19 साथीच्या आजारामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारांची संख्या अजूनच वाढली.तसेच रस्त्यावरील विक्रेते, ठेलेवाला, फेरीवाल्यांच्या उपजीविकेवर याचा विपरित परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन, PM स्ट्रीट व्हेंडरची आत्मानिर्भर निधी (PM SVANidhi) – केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांनी 1 जून 2020 रोजी खेळत्या भांडवलासाठी विशेष सूक्ष्म-क्रेडिट सुविधा देण्यासाठी, प्रधानमंत्री स्वनिधी योजना हि केंद्रीय क्षेत्र योजना सुरू केली. या योजनेला ‘प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड’ असेही म्हणतात. ही योजना सुरू करण्यामागे बेरोजगारांना घरपोच रोजगार उपलब्ध करून देणे आणि लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

स्वनिधी योजनेअंतर्गत, सरकार रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना व छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायानुरूप 10,000 रुपये कर्ज कोणत्याही तारणाशिवाय उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून ते स्वावलंबी होऊन त्यांचा रोजगार पुन्हा सुरू करू शकतील. कर्जाचे एका वर्षाच्या आत, लोकांनी हप्ता भरणे आवश्यक आहे. या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांच्या खात्यात सरकार 7% वार्षिक व्याज अनुदान स्वरूपात जमा करेल.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 मराठी | स्ट्रीट व्हेंडरची आत्मनिर्भर निधी

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 Highlights

योजनेचे नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना
कोणा व्दारा सुरु माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लाभार्थी देशातील पथ विक्रेते आणि छोटे व्यावसायिक
उद्देश्य कोविड-19 लॉकडाऊनमुळे विपरित परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यासाठी खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देणे
विभाग गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार
लाभ 10,000 रुपये ते 50,000 रुपये कर्ज
अधिकृत वेबसाईट https://pmsvanidhi.mohua.gov.in/

पीएम स्वनिधी योजना नवीन अपडेट

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत, देशभरात पसरलेल्या 3.8 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) केंद्रांद्वारे रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना व छोट्या व्यावसायिकांना 50,000/- रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. सरकारच्या डिजिटल आणि ई-गव्हर्नन्स सर्व्हिस युनिट सीएससी, ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडने सांगितले की, प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड योजना हाऊसिंग आणि अर्बन अफेयर्स मंत्रालयाद्वारे पूर्णपणे अर्थसहाय्यित आहे, हे उद्योजक या योजनेअंतर्गत कर्ज घेणार आहेत. तसेच नियमित कर्ज परतफेडीसाठी प्रोत्साहन दिले जाईल, तसेच डिजिटल व्यवहारांवर देखील पुरस्कार देण्यात येईल. या व्यावसायिकांना योजनेंतर्गत नोंदणी करण्यास CSC मदत करेल, या योजनेंतर्गत  आतापर्यंत 2 लाख अर्ज आले आहेत, तर 50,000 व्यावसायिकांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

PM स्वानिधी योजनेंतर्गत लाभार्थी व्यवसायिकाला पहिल्या वेळेला 10 हजार रुपये विनातारण कर्ज कोणत्याही हमी शिवाय उपलब्ध होणार आहे. जर त्याने पहिल्या कर्जाची वेळेत परतफेडते केली तर तो दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा तो 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरू शकतो.

कन्यादान योजना महाराष्ट्र

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट

कोविड-19 साथीच्या काळात आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, रस्त्यावरील विक्रेते तसेच छोटा व्यवसाय करणाऱ्यांचा उद्योग/ व्यवसायच बंद झाला,कित्येक लोक मरण पावले. नोकरी गेलेल्या, घरातला कर्ता व्यक्ती मरण पावलेल्याना, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या उद्योजकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा लोकांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात 10,000/- पर्यंत कमी व्याजावर खेळते भांडवल कर्ज दिले जाते. तसेच हे कर्ज विनातारण कर्ज आहे.

या योजनेचे उद्दिष्ट सरकार रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना व छोट्या व्यावसायिकांना आर्थिक परिस्थितीने सक्षम बनविणे हे आहे.

पीएम स्वनिधी योजनेचे फायदे

 • या योजनेचा रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना व छोट्या व्यावसायिकांना दिला जाईल.
 • स्वानिधी योजनेंतर्गत, शहरी/ग्रामीण भागातील रस्त्यावर माल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना लाभार्थी बनवण्यात आले आहे.
 • पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कोणतीही हमी न देता 10 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज विनातारण उपलब्ध होते.
 • जे लाभार्थी हे कर्ज वेळेवर परत करतील त्यांना 7% वार्षिक व्याज अनुदान सरकारकडून हस्तांतरित केले जाईल.
 • पीएम स्वानिधी योजनेंतर्गत लाभार्थीला पहिल्या वेळेला 10 हजार रुपये विनातारण कर्ज मिळेल, जर त्याने ते कर्ज वेळेत पूर्ण केले तर तो दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा तो 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरू शकतो.
 • जर लाभार्त्याने वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्याला या योजनेअंतर्गत दुप्पट रकमेचे कर्ज मिळेल.
 • या योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना व छोट्या व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे.
 • तंत्रज्ञानाचा वापर करून फेरीवाल्यांनची व किरकोळ विक्रेत्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि कोरोनाच्या काळात मोठे नुकसान सहन करावे लागले या संकटाच्या काळात नव्याने व्यवसाय उभारून आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करण्यासाठी या योजनेद्वारे मदत केली जाते.
 • या योजनेंतर्गत, लाभार्थ्याला संपूर्ण पैसे खात्यात तीन पटीने मिळतील म्हणजेच तुम्हाला दर तीन महिन्यांनी एक हप्ता मिळेल. हे कर्ज तुम्हाला 7% व्याजाने मिळेल.

पीएम स्वानिधी योजना मोबाईल ॲप

स्वानिधी योजनेअंतर्गत देशातील रस्त्यावरील फेरीवाल्यांनची व किरकोळ विक्रेत्यांसाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पीएम सुनिधी ॲप लाँच केले आहे. आता किरकोळ पथ विक्रेते या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे योजनेअंतर्गत थेट अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत अर्ज करून रस्त्यावरील फेरीवाले व किरकोळ विक्रेते स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी व व्यवसाय वाढविण्यासाठी सरकारकडून मदत मिळवू शकता. कोणत्याही अँड्रॉइड मोबाईल फोनवर हे ऍप्लिकेशन इंस्टॉल करणे आणि वापरणे खूप सोपे आहे. हे मोबाइल अॅप पथ विक्रेत्यांकडून कर्ज अर्ज सोर्सिंग करण्यासाठी विकसित केले आहे. या अर्जावर तुम्हाला LI च्या फील्ड ऑफिसर जसे की बँकिंग करस्पॉन्डंट्स आणि NBFCs/मायक्रोफायनान्स संस्थांचे एजंट यांच्या सुविधांचे फायदे दिले जातात.

मागेल त्याला शेततळे अनुदान योजना

बालिका समृद्धि योजना संपूर्ण माहिती

डिजिटल पेमेन्ट केल्यास कॅशबॅक मिळेल

सरकारने या योजनेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी डिजिटल पेमेन्टचा अवलंब केलेल्या विक्रेत्यांना कॅशबैक सुविधा प्रदान करून डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित केले जाते.

डिजिटल पेमेंट केल्यास मिळणारी कॅशबॅक सुविधा पुढीलप्रमाणे.

 • एका महिन्यात 50 Eligible ट्रान्जेक्शन केल्यास 50 रुपये कॅशबॅक मिळेल.
 • त्यानंतर पुढील 50 व्यवहारांवर 25 रुपये कॅशबॅक मिळेल.
 • त्यानंतर पुढच्या 100 किंवा अधिक व्यवहारांवर 25 रुपये कॅशबॅक मिळेल.
 • एका महिन्यात एकूण 100 रुपये कॅशबॅक मिळेल .
 • एका वर्षात एकूण 1200 रुपये कॅशबॅक मिळेल.

पीएम स्वानिधी योजना स्वनिधी योजना कर्ज देणाऱ्या संस्था

 • प्रादेशिक ग्रामीण बँक
 • सहकारी बँक
 • बिगर बँकिंग वित्त कंपन्या
 • स्मॉल फायनान्स बँक
 • मायक्रो फायनान्स संस्था आणि SHG बँका
 • अनुसूचित व्यावसायिक बँक
 • बचत गट बँका

पीएम स्वानिधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत?

 • भाजी विक्रेता
 • फळ विक्रेता
 • चहा स्टँड
 • नाईची दुकाने
 • जोडे दुरस्ती दुकाने मोची
 • पान सुपारीची दुकाने (पानटपरी)
 • लॉन्ड्री दुकाने (धोबी)
 • खाण्यासाठी तयार स्ट्रीट फूड
 • ब्रेड, डंपलिंग्ज आणि अंडी विक्रेते
 • कपडे विकणारे व्यापारी
 • पुस्तके / स्टेशनरी धारक
 • कारागीर उत्पादने

 प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना

लखपति दीदी योजना माहिती

PM स्वनिधी योजना लाभार्थी पात्रता निकष

 • या प्रधानमंत्री स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, ज्यांच्याकडे वेंडिंग सर्टिफिकेट किंवा ओळखपत्र आहे ते पथ विक्रेते पात्र आहेत.
 • स्थानिक संस्था (ULB) विक्रेते, ज्यांना सर्वेक्षणात ओळखले गेले आहे परंतु त्यांना वेंडिंग प्रमाणपत्र/ओळखपत्र जारी केलेले नाही त्यांच्यासाठी आयटी आधारित प्लॅटफॉर्मद्वारे अशा विक्रेत्यांसाठी विक्रीचे तात्पुरते प्रमाणपत्र तयार केले जाईल. व एक महिन्याच्या कालावधीत अशा विक्रेत्यांना कायमस्वरूपी व्हेंडिंग सर्टिफिकेट तयार केले जाईल
 • शहरी/ग्रामीण भागातील विक्रेते ULB च्या भौगोलिक मर्यादेत विक्री करतात आणि त्यांना ULB/TVC द्वारे शिफारस पत्र (LoR) जारी केले आहे.

स्वनिधी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • मनरेगा कार्ड
 • बँक खाते पासबुक
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • ULB किंवा TVC किंवा ULB कडून LoR द्वारे जारी केलेले वेंडिंग माणपत्र किंवा ओळखपत्राचे प्रमाणपत्र.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

 • सर्व प्रथम अर्जदाराला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
 • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर,तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
 • यानंतर तुम्हाला प्लॅनिंग टू अप्लाय फॉर लोन हा पर्याय दिसेल.
 • त्यानंतर, कर्जासाठी अर्ज करण्याच्या योजनेतील सर्व 3 चरण काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा आणि View More बटणावर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला या पेजवर View/Download Form या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर पीएम स्वानिधी योजनेच्या फॉर्मची PDF तुमच्या समोर उघडेल.
 • तुम्ही या योजनेची PDF अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
 • यानंतर, तुमचा अर्ज नमूद केलेल्या संस्थांमध्ये जाऊन सबमिट करावा लागेल.

महाराष्ट्र अस्मिता योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया

 • सर्वप्रथम तुम्हाला स्वानिधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला होम पेजवर Know Your Application Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. ज्या मध्ये तुमचा अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर आणि OTP या पेजवर टाकावा लागेल.
 • यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या समोर स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 FAQ

प्रश्न: स्वनिधी योजना म्हणजे काय?

उत्तर: PM  स्वानिधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्वकांक्षी योजना आहे.या योजनेंतर्गत, रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थीला काहीही तारण ठेवण्याची गरज लागणार नाही.त्यामुळे सर्वजण स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकतील तसेच आधीपासून असलेले आपल्या व्यवसायाचा विस्तार करतील.

त्यासाठी पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, सरकार पथ विक्रेत्यांना  10,000 रुपयांचे कर्ज दिले जाते. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावर सबसिडी देखील देते. जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर नंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत दुप्पट रकमेचे कर्ज मिळेल. म्हणजेच कोणत्याही हमीशिवाय तुम्ही आणखी कर्ज घेऊ शकता.

प्रश्न: स्वानिधी योजना कर्जाची परतफेड कालावधी किती आहे?

उत्तर: कर्जाची परतफेड कालावधी हा 1 वर्षे आहे.

प्रश्न: पंतप्रधान स्वानिधी योजनेसाठी कोण पात्र आहे?

उत्तर: ज्यांनी स्ट्रीट व्हेंडर्स (रोट व्हेंडिंगचे संरक्षण आणि नियमन) कायदा, 2014 अंतर्गत नियम आणि योजना अधिसूचित केल्या आहेत . मेघालयातील लाभार्थी, ज्यांचा स्वतःचा राज्य मार्ग विक्रेता कायदा आहे, तथापि, त्यात सहभागी होऊ शकतात.

प्रश्न: स्वानिधी योजनेत व्याजदर किती आहे?

उत्तर: पीएम स्वनिधी योजनेसाठी अनुदानित व्याज दर 7% आहे. परंतु प्रत्येक बँकेच्या प्रचलित कर्ज व्याजदरानुसार व्याज आकारणी निश्चित केले जातात.

50,000 रु. कर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या इतर योजना :

 राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना 

फेम इंडिया स्कीम