प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी | प्रधानमंत्री मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज (PMMY)

Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2023 | PM Mudra Lone Yojana | मुद्रा लोन घेण्यासाथी अर्ज कुठे करायचा | मुद्रा कार्ड मराठी | प्रधानमंत्री मुद्रा योजना, लाभ, पात्रता, व्याज दर, नियम संपूर्ण माहिती मराठी | Pradhan Mantri Mudra Yojana Registration | प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना | (PMMY) 2023

 

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी नाव नवीन योजना आणते. या योजनांचा उद्देश हा आपल्या देशातील प्रत्येक वर्गातील नागरिकांना मदत करता येईल. कोरोनाच्या काळात देशात मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या व काहींना व्यवसायही बंद काराबवा लागला. अशा परिस्थितीत, लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि नव-नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे ज्याचे नाव आहे ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ (PM मुद्रा योजना). योजने अंतर्गत लघु/सूक्ष्म उद्योगांना 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. तेही कोणत्याही हमी शिवाय.

चला तर मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना योजना  संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि मुद्रा लोन योजना काय आहे?  या  योजनेचे फायदे, योजनेसाठी लागणारी पात्रता, महत्वाची कागदपत्रे, अर्ज पद्धती, वैशिष्टे, कर्जाचा परतफेड कालावधी, लोन व्याजदर किती आहे? इत्यादी. गोष्टींची माहिती आपण आज या लेखात पहाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 संपर्णू माहिती

PM मुद्रा योजना : ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ ही नॉन-कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज घेऊ शकता. या योजनेचे सर्वात महत्वपूर्ण वैशिट्ये म्हणजे तुमच्याकडून कर्जावर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क (Processing Fees) आकारले जात नाही. मुद्रा कर्जावरील व्याज दर मार्जिनल कॉस्ट ऑफ लेन्डिंग रेट (Marginal Cost of Lending Rate) किंवा एम सी एल आर (MCLR) द्वारे निर्धारित केले जाते, ज्याची गणना हि (RBI)आर बी आय च्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाते. केंद्र सरकारने मुद्रा कर्जासाठी 3 लाख कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते, त्यापैकी 1.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. तसेच या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षांनी वाढवण्यात आला आहे. PM मुद्रा योजनेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुद्रा कार्ड मिळते. डेबिट कार्डप्रमाणेच तुम्ही हे कार्ड वापरू शकता.

सूक्ष्म किंवा लघु व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ही योजना व्यावसायिकांना बँकाअंतर्गत सुलभ अटींवर कर्ज देत आहे.ही कर्जे व्यावसायिक बँका, RRB, लघु वित्त बँक, सहकारी बँका, MFI आणि NBFC द्वारे व्यावसायिकांना दिली जातात. या योजनेंतर्गत दिले जाणारे कर्ज शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन भागात विभागले गेले आहे.लाभार्थी व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार कोणतीही एक श्रेणी निवडून या योजनेतून कर्ज लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत कोणताही लहान व्यावसायिक कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतो. तसेच त्यांचा सुरु असलेला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी | प्रधानमंत्री मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज (PMMY)

प्रधानमंत्री मुद्रा योजना Highlights

योजनेचे नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना
योजना आरंभ 8th एप्रिल 2015
लाभार्थी देशातील लहान व्यावसायिक
उद्देश्य व्यायसायासाठी कर्ज पुरवठा करणे
कर्जाची रक्कम 50 हजार ते 10 लाख रुपये
अधिकृत वेबसाईट mudra.org.in

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना प्रकार

मुद्रा कर्ज योजनेची 3 श्रेणींमध्ये विभागणी केली गेली आहे. तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

 • शिशु कर्ज योजना
 • किशोर कर्ज योजना
 • तरुण कर्ज योजना

शिशु कर्ज योजना  :  या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 50  हजारांपर्यंत व्यवसाय कर्ज वाटप केले जाईल. शिशू कर्जाची रक्कम सूक्ष्म व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध आहे.

किशोर कर्ज योजना : या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत  50 हजार ते 5 लाखांपर्यंत व्यावसायिक कर्ज दिले जाते. जर तुम्ही आधीच व्यवसाय सुरू केला असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. यासोबतच कर्जाची रक्कम देताना अर्ज आणि क्रेडिट रेकॉर्डची तपासणी केली जाते. क्रेडिट रेकॉर्ड बरोबर आढळल्यास कर्ज मंजूर केले जाते.

तरुण कर्ज योजना : या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 5 लाख ते 10 लाखांपर्यंतचे व्यवसाय कर्ज दिले जाते. ज्यांनी व्यवसाय सुरु केला आहे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय आणखी वाढवायचा आहे. त्यासाठी लागणारी मालमत्ता खरेदी करण्याची आवश्यकता आहे. त्यांना या प्रकरणात, कर्जाची रक्कम दिली जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे उद्दिष्ट 

 • ज्यांच्याकडे व्यवसायिक कुशल ज्ञान आहे. उत्पादन, प्रक्रिया, व्यापार किंवा सेवा क्षेत्रासारख्या बिगरशेती प्रकल्पातून उत्पन्न मिळविण्याची व्यवसाय योजना आहे परंतु गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल नाही .पैशांअभावी ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत अशा लोकांना 10 लाखांपर्यंत कर्ज मंजूर करणे.
 • या योजनेअंतर्गत, लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा त्यांचा सुरु असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी देखील लाभार्थी कर्ज मिळवू शकतात.
 • या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, देशातील जास्तीत जास्त तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे आहे. जेणेकरून देशातील बेरोजगारी कमी होऊन देशाची प्रगती होईल.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे

 • देशातील कोणतीही व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तो PMMY अंतर्गत कर्ज घेऊ शकतो.
 • दुकानदार, भाजीपाला विक्री, फेरीवाले अशा लहान व्यवसायाकरिता मुद्रालोन चा जास्त फायदा होतो.
 • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत नागरिकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी हमीशिवाय कर्ज दिले जाते.
 • कर्जासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क घेतले जात नाही.
 • मुद्रा योजनेंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
 • महिला उद्योजकांना कर्ज आणि आथिर्क संसाधनांमध्ये सुलभ प्रवेश प्रधान करून महिला सक्षमीकरणावर केंद्र सरकारकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
 • मुद्रा लोन घेण्यासाठी कोणत्याही तारण किंवा सुरक्षिततेची आवश्यकता लागत नाही.
 • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जदाराची क्रेडिट गॅरंटी सरकारकडून घेतली जाते, त्यामुळे कर्जदार कर्ज घेतलेल्या रकमेची परतफेड करू शकला नाही, तर नुकसानीसाठी सरकार जबाबदार असेल.
 • कर्जदाराला मुद्रा कार्ड मिळते ज्याच्या मदतीने तो व्यावसायिक गरजांवर डेबिट कार्डप्रमाणेच खर्च करू शकतो.

वसंतराव नाईक महामंडळ व्यवसाय कर्ज योजना

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना

मुद्रा लोन अंतर्गत कोण कर्ज मिळवू शकते?

मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत खालील श्रेणीतील व्यवसायांना मुद्रा कर्ज मिळेल

 • लघु उद्योग व्यवसाय मालक
 • पार्टनरशिप
 • सेवा क्षेत्रातील कंपन्या
 • अन्न संबंधित व्यवसाय
 • फळे आणि भाजीपाला विक्रेता
 • ट्रक/कार मालक
 • दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी व्यवसाय कर्ज
 • कापड उत्पादने क्षेत्र
 • दुरुस्तीचे दुकान
 • हॉटेल मालक
 • शेती आणि संबंधित क्रियाकलाप
 • सूक्ष्म उत्पादन फॉर्म

PMMY अंतर्गत समाविष्ट क्षेत्रे

क्षेत्र क्षेत्रातील उपक्रमांचे प्रकार
जमीन वाहतूक क्षेत्र ऑटो रिक्षा, ई-रिक्षा, प्रवासी कार, टॅक्सी. लहान माल वाहतूक करणारी वाहने
सामाजिक सेवा क्षेत्र ब्युटी पार्लर, टेलरिंग स्टोअर्स, बुटीक,सलून, ड्राय क्लीनिंग सेवा इ. व्यायामशाळा, खेळाडूंचे प्रशिक्षण, वैद्यकीय दुकाने,सायकल आणि मोटरसायकल दुरुस्ती गॅरेज इ. इतर सेवा फोटोकॉपीची दुकाने, कुरिअर एजन्सी इत्यादी
अन्न उत्पादन क्षेत्र पापड, लोणचे, जॅम, मिठाईची दुकाने, छोटी सेवा अन्न केंद्रे इ. दररोज केटरिंग सेवा, कॅन्टीन इ. सूक्ष्म शीतगृहे, बर्फ बनवण्याचे कारखाने, कोल्ड चेन वाहने, आइस्क्रीम बनवण्याचे उद्योग इ. बेकरी आणि बेक्ड उत्पादनांचे उत्पादन आणि इतर कृषी उत्पादन/संरक्षण पद्धती तयार करणे.
वस्त्रोद्योग क्षेत्र हातमाग आणि यंत्रमाग उद्योग जसे की भरतकाम, चिकन वर्क, डाईंग आणि प्रिंटिंग, विणकाम इ. कपडे आणि गैर-वस्त्रांसाठी यांत्रिक किंवा संगणकीकृत शिलाई. ऑटोमोबाईल आणि फर्निशिंग एक्सेसरीजचे उत्पादन इत्यादी

 

पीएम मुद्रा योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांची संख्या

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत 68% लाभार्थी महिला आहेत. ज्या एससी, एसटी समाजातील महिला आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत. हि माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 10 जानेवारी 2023 रोजी राज्यसभा बैठकीत दिली होती. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणावर केंद्र सरकारकडून विशेष लक्ष दिले जात आहे. या योजनेमध्ये विशेष बाब म्हणजे योजनांमध्ये 4 जणांना व्यवसायिक मुद्रा कर्ज दिले तर, त्या चार पैकी 3 महिला असतील. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत महिलांनाही सर्वाधिक कर्ज (मुद्रा कर्ज) देण्यात आले आहे.या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही नागरिकाला मिळू शकतो.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना दिले गेलेले कर्ज

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना देण्यात आलेले कर्ज खालील प्रमाणे

  खाते क्रमांक (कोटींमध्ये) मंजूर रक्कम (लाख कोटीमध्ये)
एकूण कर्ज 32.11 17
महिलांना कर्ज दिले जाते 21.73 7.4
महिला उद्योजकांची टक्केवारी 68% 44%

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन कोणत्या बँकांकडून मिळते?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, देशातील 21 सरकारी बँका, 17 खाजगी क्षेत्रातील बँका,  4 सहकारी बँका, 31 प्रादेशिक ग्रामीण बँका,36 सूक्ष्म वित्त संस्था आणि 25 नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) कडून मुद्रा कर्ज घेतले जाऊ शकते.

मुद्रा लोन योजनेअंतर्गत समाविष्ट बँकांची यादी

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील समाविष्ट बँकांची लिस्ट पुढीलप्रमाणे

 • अलाहाबाद बँक
 • बँक ऑफ बडोदा
 • बँक ऑफ इंडिया
 • बँक ऑफ महाराष्ट्र
 • कॅनरा बँक
 • आंध्र बँक
 • देना बँक
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
 • कॉर्पोरेशन बँक
 • आयडीबीआय बँक लिमिटेड
 • इंडियन बँक
 • UCO बँक
 • इंडियन ओव्हरसीज बँक
 • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
 • पंजाब आणि सिंध बँक
 • पंजाब नॅशनल बँक
 • स्टेट बँक ऑफ इंडिया
 • सिंडिकेट बँक
 • युनियन बँक ऑफ इंडिया
 • युनायटेड बँक ऑफ इंडिया

माझी कन्या भाग्यश्री योजना

थेट कर्ज योजना महाराष्ट्र : समाज कल्याण योजना

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता

 • अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
 • मुद्रा योजनेअंतर्गत कर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
 • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत अर्जदार हा कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 • स्वतःचा लघु उदयोग / व्यवसाय सुरू करणारे लोक आणि ज्यांना त्यांचा लहान व्यवसाय वाढवायचा आहे ते देखील या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात.

मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ. मधील कोणताही एक पुरावा.
 • पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिले, मतदार ओळखपत्र कोणताही एक पुरावा.
 • उत्पन्नाचा पुरावा : मागील 6 महिन्यांचे बँक खाते विवरण, आयकर रिटर्न/विक्रीकर रिटर्न.
 • व्यवसायाच्या अस्तित्वाचा पुरावा : व्यवसाय / उद्योगाचा परवाना किंवा व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र.
 • विकत घ्यावयाच्या मशीनरी, वस्तूंचे इ. कोटेशन/बांधकामाचे अंदाजपत्रक.
 • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री, इत्यादी घेणार आहात त्याचे कोटेशन व बिले.
 • SC/ST/OBC/अल्पसंख्यांक असल्यास विशेष श्रेणीशी संबंधित असल्याचा पुरावा.
 • पासपोर्ट साईज फोटो.

मुद्रा लोन व्याज दर 2023 (Mudra Loan Interest Rate)

बँक व्याज दर
स्टेट बँक ऑफ इंडीया 9.75% पासून
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 8.15% पासून
बँक ऑफ महाराष्ट्र 8.55% पासून
कॉर्पोरेशन बँक 9.35% पासून
बँक ऑफ बडोदा 8.15% पासून
आंध्रा बँक 8.20% पासून
पंजाब नॅशनल बँक 9.60% पासून
यूनियन बँक ऑफ इंडिया 10.30% पासून
सारस्वत बँक 11.65% पासून

 

टीप : वरील देण्यात आलेले व्याजदर हे  बँक आणि आरबीआय (RBI) निश्चित करते. याच्यात कधीही बदल होऊ शकतो. तर तुम्ही ज्याही बँकेतून मुद्रा लोण घेत असाल त्याचे सध्या स्थितीचे व्याज दर जाणून घेण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क करा किंवा अधिकृत वेबसाइट वरती जाणून चेक करा.

महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

मुद्रा कार्ड

मुद्रा कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला मुद्रा कार्ड दिले जाते जे डेबिट कार्ड असते. तुम्ही यशस्वीरित्या कर्जासाठी अर्ज केल्यानंतर, बँकेत अर्जदारासाठी कर्ज खाते ओपन होते आणि निर्धारित रक्कम त्या खात्यात जमा होते हि कर्जाची रक्कम काढण्यासाठी मुद्रा कार्ड वापरू शकता.

ज्याप्रमाणे एटीएममध्ये जाऊन एटीएम कार्डमधून पैसे काढता येतात, त्याचप्रमाणे मुद्रा कार्डमधून पैसे काढता येतात. परंतु  महत्त्वाची गोष्ट हि आहे कि एटीएम कार्ड तुमच्या बँक खात्यातून पैसे काढते पण मुद्रा कार्ड तुम्हाला कर्ज देते. वास्तविक व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुद्रा कार्ड वापरले जाते.

 

मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा? How to apply for Mudra Loan Scheme?

प्रधानमंत्री मुद्रा लोन घेण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. मुद्रा योजनेतून मुद्रा लोन अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

 • प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाणे आवश्यक आहे.
 • तुम्हाला बँक निवडल्यानंतर कर्ज अर्ज भरावा लागेल आणि तुमच्या व्यवसायची योजना बनवावी लागेल.
 • जेव्हा व्यवसाय योजना तयार झाल्यानंतर तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेचा फॉर्म घेऊन तो योग्यरित्या भरावा लागेल.
 • पूर्णपणे फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारांनी सर्व कागदपत्रे जोडून फॉर्म बँकेत जमा करावा.
 • बँक फॉर्मची पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर अर्ज मंजूर केला जाईल.
 • कर्ज मंजूरीनंतर,निर्देशित रक्कम एक महिन्यात नमूद केलेल्या बँक खात्यात वितरित केली जाईल.

299/399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 

मुद्रा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

 • प्रधानमंत्री मुद्रा लोन साठी सर्वप्रथम तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
 • आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
 • मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर होम पेज उघडेल.
 • पंतप्रधान मुद्रा लोन योजना मध्ये तुम्हाला मुद्रा योजनेचे प्रकार मुख्यपृष्ठावर दिसतील जसे कि शिशु, युवा, तरुण
 • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
 • तुम्हाला या पेजवरून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
 • यानंतर तुम्हाला या अर्जाची प्रिंट घ्यावी लागेल.
 • आता तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती अचूक भरावी लागेल.
 • यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म बरोबर जोडावी लागतील.
 • आता तुम्हाला हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत जमा करावा लागेल.
 • 1 महिन्याच्या आत तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज नमूद केलेल्या बँक खात्यात वितरित केली जाईल.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचा टोल फ्री नंबर

महाराष्ट्रासाठी मुद्रा कर्ज टोल फ्री क्रमांक : 1800-102-2636

मुद्रा योजना राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : 1800-180-1111 / 1800-11-0001

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 FAQ

प्रश्न : PM मुद्रा योजना काय आहे ?

उत्तर : मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. (मुद्रा ), भारत सरकारद्वारा स्थापन केलेली एक वित्तीय संस्था आहे जी लघु उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त उपलब्ध करून देते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत व्यावसायिक कर्ज आणि 5 वर्षांपर्यंत परतफेड कालावधीसह 50 हजार ते 10 लाखांपर्यंतच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जासाठी मुक्त कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत लहान कारखानदारांना व दुकानदारांना त्यांच्या नवीन उद्योग चालू करण्याकरिता हे कर्ज दिले जाते. तसेच लहान उद्योग जसे महिला उद्योग, घरगुती उद्योग, भाजीपाला उद्योग व इतर उद्योगकरिता मुद्रा लोन दिले जाते.

प्रश्न : मुद्रा लोन व्याजदर किती आहे?

उत्तर : मुद्रा लोन योजनेसाठी व्याजदर 7.30% p.a पासून सुरु होतो.

प्रश्न : मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहेत?

उत्तर : नॉन-कॉर्पोरेट लघु व्यवसाय विभागासाठी आहेत ज्यात सेवा क्षेत्रातील युनिट्स, छोटे उद्योग, लहान उत्पादन युनिट्स, भाजीपाला किंवा फळ विक्रेते, दुरुस्तीची दुकाने, भागीदारी आणि मालकी कंपन्यांचा समावेश आहे.

 

शासनाच्या इतर योजना : 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

बाल संगोपन योजना 2023

मुख्यमंत्री किसान कल्याण योजना

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र