मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना | Motar Vahan Chalak Prashikshan Yojana In Marathi

वाहन चालक प्रशिक्षण योजना 2024 | अनुसूचित जमातीच्या युवकांना मोफत मोटार वाहन चालक प्रशिक्षण | Vahan Chalak Prashikshan Yojana

 

महाराष्ट्र शासन राज्यातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि नवबौध्द घटकातील नागरिकनांसाठी विविध सरकारी योजना सुरु करत असते आता अशीच एक नवीन योजना महाराष्ट्र शासन सुरु केली आहे जिचे नाव आहे मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नवबौध्द प्रवार्गाच्या तरुणांना व महिलांना मोफत वाहन चालक प्रशिक्षण दिले जाते.

तर मग चला मित्रांनो आज आपण या महत्वपूर्ण मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि योजनेमध्ये अर्ज कसा करावा, या योजनेचे लाभ काय आहे? या योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी, कागदपत्रे, हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना संपूर्ण माहिती मराठी

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना : राज्यातील वाढणारी वाहतुक व्यवस्था तसेच दिवसेंदिवस लोकांचा पर्यटनाकडे वाढणारा कल लक्षात घेता,वाहन व्यवसायामध्ये रोजगाराची मोठया प्रमाणात संधी निर्माण होत आहे.परंतु राज्यातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नवबौध्द घटकातील लोकांची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याकारणाने त्यांना वाहन चालक प्रशिक्षण घेता येत नाही. प्रशिक्षण घेण्यासाठी लागणारी फी भरण्यासाठी पुरेशे पैसे नसतात. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने मागासवर्गीय तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांना कौशल्यपुर्ण प्रशिक्षण मिळावे म्हणून मोटार वाहन प्रशिक्षण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

सदर योजनेअंतर्गत सुरुवातीस महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत मोटार वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने प्रशिक्षण देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना मोफत मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्याना व्यवसायात आणून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उचावणे या दृष्टीने राज्यात मोटर वाहन चालकाचे प्रशिक्षण मान्यता प्राप्त संस्थांकडून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निणर्य दिनांक 4 फेब्रुवारी 2008 नुसार कार्यान्वित करण्यात आली. मोटर वाहन चालक प्रशिक्षण देणान्या संबंधीत संस्थेचा करारनामा दिनांक 4 फेब्रुवारी 2015 रोजी संपुष्टात आल्याने प्रशिक्षण सन 2015-16 या वषापासून बांद होती. त्या नंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक मोवाप्र- 2017 /प्र.क्र. 135 / शिक्षण, दिनांक 23 फेब्रुवारी 2028 नुसार सुधारीत नियमावलीप्रमाणे सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना | Motar Vahan Chalak Prashikshan Yojana In Marathi

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना Highlights

योजनेचे नाव मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोणा द्वारा सुरु महाराष्ट्र शासन
लाभार्थी अनुसूचित जाती-जमातीच्या व नवबौध्द घटकातील तरुण व महिला
लाभ मोफत वाहन चालक प्रशिक्षण
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचा उद्देश

 • अनुसूचित जाती-जमातीच्या व नवबौध्द घटकातील तरुणांना मोफत मोटार वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करून त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • अनुसूचित जाती-जमातीच्या व नवबौध्द घटकातील तरुणांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविणे.
 • वाहन चालक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
 • राज्यातील तरुणांना सशक्त व आत्मनिर्भर बनवून त्यांचे जीवनमान सुधारणे.

वाहन चालक प्रशिक्षण योजनेची वैशिष्ट्ये

 • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक कल्याण विभागामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या व नवबौध्द घटकातील तरुणांना जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
 • मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क घेतले जात नाही.
 • मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयामध्ये राबविण्यात आली आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

वाहन चालक प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी कोण ?

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गीय प्रवर्गातील तरुण या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचे फायदे

 • मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गीय प्रवर्गातील नागरिकांना मोफत मोटार वाहन चालक प्रशिक्षण दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत लाभार्त्याला प्रशिक्षणा साठी कोणत्याही प्रकारची फी (शुल्क) देण्याची गरज नाही.
 • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊन वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो.
 • वाहन चालक प्रशिक्षण योजनेमुळे राज्यातील वाढणारी वाहतुक व्यवस्था तसेच पर्यटनाकडे वाढणारा कल यामुळे वाहन चालक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
 • राज्यातील तरुण आत्मनिर्भर बनतील तसेच आर्थिक विकास होईल.

योजनेअंतर्गत मोटार वाहन प्रशिक्षणासाठी देण्यात येणारी रक्कम

प्रशिक्षण प्रकार प्रशिक्षण दर प्रशिक्षणाचा कालावधी इतर अटी
लाईट मोटार

व्हेहीकल (हलके वाहन)

4264/- रु. 40 दिवस ——
हेवी मोटार

व्हेहीकल (अवजड वाहन)

4960/- रु. 40 दिवस किमान 1 वर्ष LMV ट्रान्सपोर्ट लायसन्स धारण केलेले असावे.
वाहक 1728/- रु. 8 दिवस —–

 

सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोटार वाहन व चालक प्रशिक्षण योजनेनुसार ड्रायविंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस शासन लाभार्थ्यांना पोस्टाने चालक/ वाहक परवाना पाठविणे करीता प्रतिलाभार्थी 100/- रुपये एवढी रक्कम देण्यात येते.

कडबा कुट्टी मशीन योजना

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेच्या लाभाचे स्वरूप

 • लाभार्थी उमेदवारांना खाजगी ड्रायव्हीग स्कूलमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येते प्रत्येक सत्रात किमान 50 उमेदवारांना प्रवेश देण्यात येतो.
 • लाभार्थी उमेदवाराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊन वाहन चालविण्याचा परवाना व वाहकास बॅच देण्यात येतो.
 • प्रशिक्षण झाल्यानंतर लाभार्थी उमेदवारांना परवाना व बॅच मिळाल्यानंतर शासनाने नमूद केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस अदा केली जाते.
 • संस्थेमार्फत केली जाते.प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवाराला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शासन विशेष लक्ष देते.
 • प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवाराला जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणे येण्याचे भाडे, आरोग्य तपासणी, छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना, वाहक परवाना व बिल्ला, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.
 • प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयी राहणारा स्थानिक प्रशिक्षणार्थी वसतिगृहात रहात नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थीस 300/- रुपये व वाहक प्रशिक्षणार्थ्यास 150/- रुपये याप्रमाणे प्रशिक्षण काळात प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यावेतन देण्यात येते.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक पात्रता

 • प्रशिक्षणार्थी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • प्रशिक्षणार्थी उमेदवार हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा.
 • हलके वाहन चालक परवाना करीता वय 18 वर्षे पुर्ण, तर जड वाहन चालक परवाना करीता वय 20 वर्षे पूर्ण असावे. वरील दोन्ही परवान्यांसाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असेल.
 • प्रशिक्षणार्थी अर्जदार हा किमान इयत्ता 8वी उत्तीर्ण व बेरोजगार असावा.

ग्रामीण शौचालय योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र 

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेच्या अटी व शर्ती

 • मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुणांनाच देण्यात येईल.
 • प्रशिक्षणार्थी उमेदवार हा अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,इतर मागास वर्गीय प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
 • ज्या उमेदवारास जड वाहन परवाना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्याच्याकडे हलके मोटार वाहन परवाना (ट्रान्सपोर्ट) 1 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 50 लाख पेक्षा जास्त नसावे. त्यासाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार) यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यात यावा.
 • अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीय प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक राहील.
 • एकूण हलके मोटार वाहन प्रशिक्षणासाठी 10% जागा महिलांसाठी आरक्षित असतील. परंतु महिला प्रशिक्षणार्थीचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त झाल्यास रिक्त जागा पुरुष उमेदवारांना देण्यात येतील.
 • अर्जदारास कोणत्याही प्रकारे अंपगत्व नसावे. तसेच कोणताही दृष्टीदोष व कर्णदोष नसावा यासाठी अर्जदाराने प्रवेश अर्जात याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
 • प्रशिक्षणार्थी उमेदवार हे मोटार परिवहन अधिनियम तरतूदीनुसार शारिरीक व वैद्यकीयदृष्ट्या पात्र असणे गरजेचे आहे.
 • सदर योजनेचा लाभ एका कुंटूबातील एकाच व्यक्तीला देण्यात येईल.
 • प्रशिक्षणार्थी उमेदवाराकडे हलके मोटार वाहन चालक परवाना (license) असल्यास, तो अर्जदार या योजनेत जड वाहन परवान्याखेरीज लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
 • अर्जदारांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर व करारनामा झाल्यानंतर प्रशिक्षण सुरु करणे आवश्यक राहील, अन्यथा दंडाची रक्कम 10,000/- या प्रमाणे आकारण्यात येईल.
 • कोणतेही कारण न देता, प्रशिक्षण बंद करणे, प्रशिक्षणाचे आदेश रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त, समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे असतील.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • रहिवाशी पुरावा
 • रेशन कार्ड
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचे प्रमाणपत्र
 • उत्पन्नचा दाखल
 • शिक्षण प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • मोबाइल नंबर

लखपति दीदी योजना 

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे.

 • मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या संबधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
 • त्यानंतर सदर अर्ज समाजकल्याण अधिकारी कार्यालयात जमा करावा लागेल.
 • त्यानंतर अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित योजनेचे अधिकारी अर्जदारास प्रशिक्षणाबाबत कळवतील.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना संपर्क

हेल्पलाइन नंबर : 022-24306717 / 43226825

ई-मेल आयडी : mlwbpro53@gmail.com

अधिकृत वेबसाईट : https://mlwb.in/yojana

शासनाच्या इतर योजना :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

महिला सम्मान बचत पत्र योजना

299/399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना