रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 मराठी | Rojgar Sangam Yojana Maharashtra

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 in Marathi | Rojgar Sangam Yojana Maharashtra Online Registration Form । Rojgar Sangam Yojana Maharashtra Registration ।रोजगार संगम योजना । महाराष्ट्र रोजगार संगम योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी | रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 ऑनलाइन रजिस्ट्रेशन

 

महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्या कौशल्या प्रमाणे आणि शिक्षणाप्रमाणे रोजगार उपलब्ध नाहीत, त्यामुळे ते बेरोजगार आहेत. अशा बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी रोजगार संगम योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य सरकारकडून 5000 रुपये आर्थिक सहाय्य देखील मिळेल जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यापूर्वी त्यांच्या मूलभूत गरजा व कुटुंबाचे पालनपोषण करू शकतील. हि मदत कश्याप्रकारे मिळणार आहे याची सर्व माहिती आपण पाहाणार आहोत, म्हणजे योजनेच्या अंतर्गत असणारी पात्रता, तसेच या योजनेमध्ये अर्ज कसा करावा, या योजनेच्या वैशिष्ट्य काय आहे, अर्ज ऑनलाइन कसा करावा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहाणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचावा.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती

राज्यातील बहुतांश युवक हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध नसल्या कारणामुळे ते बेरोजगार आहेत. तसेच राज्यात बहुतांश परिवार हे दारिद्र रेषेखाली गरिबीत जीवन जगत आहेत. व्यवसायकरायचा असेल तर भांडवलाची गरज लागते परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याकारणाने असे तरुण स्वतःचा व्यवसायही करू शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अशा बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरु केली आहे. बेरोजगार युवकांना रोजगार मिळेपर्यंत या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला ₹5000/- अशी आर्थिक मदत मिळणार आहे. मिळणारी आर्थिक मदत थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

रोजगार संगम योजना ही महाराष्ट्र शासनाची तरुणांसाठी एक महत्वाची योजना आहे. जी बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करते. या योजनेअंतर्गत सरकार बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण, ऑनलाइन वर्ग आयोजित करून कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळावे आणि इतर कार्यक्रमांद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, जेणेकरून ते उपयुक्त कौशल्ये विकसित करू शकतील.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 मराठी | Rojgar Sangam Yojana Maharashtra

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 Highlights

योजनेचे नाव रोजगार संगम योजना महाराष्ट्र
कोणा व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील बेरोजगार तरुण
उद्देश्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि कौशल्ये उपलब्ध करून देणे तसेच आर्थिक मदत करणे
बेरोजगारी भत्ता 5000/- रुपये
विभाग कौशल्य विकास
अधिकृत वेबसाइट rojgar.mahaswayam.gov.in

 

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

मागेल त्याला शेततळे योजना

महाराष्ट्र रोजगार संगम योजनेचे उद्दिष्ट

 • रोजगार संगम योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सुशिक्षित बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे आहे.
 • त्याचबरोबर या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारकडून दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत हे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत बेरोजगारांना नोकरी मिळवण्याकरीत कुशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

महाराष्ट्र रोजगार संगम योजना पात्रता निकष

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
 • इतर राज्यातील तरुण रोजगार संगम योजना साठी पात्र असणार नाहीत.
 • अर्जदाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.
 • अर्जदाराकडे शैक्षणिक पदवी किंवा कोणत्याही व्यावसायिक अथवा नोकरीभिमुख कोर्समध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असावा.
 • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराला इतर कोणत्याही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार प्रायोजित शिष्यवृत्ती कार्यक्रमात नोंदणी करता येणार नाही.

रोजगार संगम योजनेचे फायदे

 • रोजगार संगम योजनेमुळे राज्यातील सुशीक्षीत बेरोजगार नागरिकांना कामाच्या संधी मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल, तसेच प्लेसमेंट सेवा पुरविल्या जातील.
 • योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.
 • अर्जदार कौशल्य विकास कार्यक्रमाच्या मदतीने कौशल्ये निर्माण करून सहजपणे कमाई करू शकतील आणि सक्षम बनू शकतील.

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना

विधवा पेन्शन योजना माहिती

महाराष्ट्र रोजगार संगम योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • रेशनकार्ड
 • EWS प्रमाणपत्र (EWS प्रमाणपत्र हे त्याच आर्थिक वर्षाचे असावे)
 • शैक्षणिक आणि डिप्लोमा प्रमाणपत्र
 • बँक पासबुक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • ई – मेल आयडी
 • मोबाईल नंबर

रोजगार संगम योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन (अर्ज प्रक्रिया)

 • सर्व प्रथम अर्जदाराची नोंदणी करण्यासाठी अधिकृत महास्वयंम वेबसाइटवर जावे.
 • त्यानंतर होम पेजवर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
 • स्क्रीनवर नोंदणी फॉर्म ओपन झाल्यानंतर सर्व माहिती अचूक भरा आणि पुढील पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर अर्ज करताना मोबाईलवर OTP येईल तो भरा.
 • अर्ज Submit करण्या अगोदर अर्ज एकदा Recheck करून घ्या.
 • हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट करा पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमचे रोजगार संगम योजना महाराष्ट्र योजनेमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासणे

 • रोजगार संगम योजना महाराष्ट्र अर्ज स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • त्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल.
 • यशस्वीरित्या लॉग इन झाल्यानंतर, अर्जदार चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे.
 • तुमच्या स्क्रीनवर नोंदणीचे तपशील दिसेल.

टीप : अर्जदाराच्या पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र

एसबीआय स्त्री शक्ती योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र हेल्पलाइन नंबर

हेल्पलाइन नंबर :  1800-120-8040

रोजगार संगम योजना महाराष्ट्र FAQ

प्रश्न : रोजगार संगम योजने अंतर्गत किती रुपये दिले जातात?

उत्तर : पात्र उमेदवारांना रोजगार संगम योजनेअंतर्गत 5,000 रुपयाचे  मासिक आर्थिक सहाय्य मिळते.

प्रश्न : रोजगार संगम योजने साठी कोण पात्र असणार?

उत्तर : गरीब कुटुंबातील जे उमेदवार बेरोजगार आहेत असे सर्व उमेदवार पात्र आहेत.

प्रश्न : महाराष्ट्र रोजगार संगम योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर : महाराष्ट्र रोजगार संगम योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

शासनाच्या इतर योजना :

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र

महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना