दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना 2024 मराठी

Horticulture scheme Maharashtra | हॉरटीकल्चर योजना 2024 मराठी | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना | अपंगांसाठी व्यायसाय कर्ज योजना

 

महाराष्ट्र राज्यात असे खूप व्यक्ती आहेत ज्यांना आपल्या शारीरीक दृष्ट्या अपंग असल्याने अपंग व्यक्तींना नोकरी व्यवसाय तसेच त्यांची दैनंदिन कामे व इतर गोष्टींमध्ये अपंगत्वामुळे खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा अपंग व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य सरकार अपंगांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून ह्या अपंगांना त्याचा लाभ प्राप्त करता येईल. आज अशाच अपंगांसाठी शासनाने सुरू केलेल्या एका महत्वाच्या योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. या योजनेचे नाव दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना असे आहे.

तर मग चला मित्रांनो, आज आपण या दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजने संबंधित सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत. जसे की त्याचा उद्देश, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज कसा करावा इत्यादी. त्यामुळे जर तुम्हाला दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना संपूर्ण माहिती

राज्यातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारावे यासाठी राज्य सरकार नवनवीन योजनांची सुरुवात करत असते. आता राज्यातील अपंग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजनेची सुरुवात केली आहे ज्या योजनेचे नाव दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना आहे. दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर ही योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग शेतकऱ्यांना स्वताचा फलोत्पादन व्यवसाय सुरू करता यावा तसेच सुरु असलेल्या फलोत्पादन व्यवसायात वाढ करता यावी म्हणून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. फलोत्पादन व्यवसाय हा कृषी उद्योगाचा एक भाग असून त्यामध्ये फळे, फुले, भाजीपाला इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे फलोत्पादन व्यवसाय वाढ करण्यासाठी फलोत्पादनामध्ये सोयी सुविधा, सुशोभीकरण आणि अन्नधान्याचे उत्पादन व उपयोग यांचा समावेश केला जातो. या व्यवसायासाठी भांडवलाची गरज असते. परंतु शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत व दिव्यांग शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतो या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना सुरु केली आहे.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना 2024 मराठी

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना Highlights

योजनेचे नाव  दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कोणा द्वारा सुरु महाराष्ट्र सरकार
उद्देश दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे
लाभ कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे उद्दिष्ट

 • राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक दृष्टया विकास करणे.
 • राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या अपंगत्व अवस्थेला धीर देणे आहे.
 • दिव्यांग शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे जेणेकरून ते मजबूत आणि स्वावलंबी होऊ शकतील.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

प्रकल्प मर्यादा 10 लाख पर्यंत
लाभार्थींचा सहभाग 5%
राज्य महामंडळाचा सहभाग 5%
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 90%
वार्षिक व्याजदर

रुपये 5 लाखापर्यंत

पुरुषांसाठी 6%

महिलांसाठी 5%

5 लाखांच्या पुढे 7%
कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षे
मंजुरी अधिकार 5 लाख पर्यंत म.रा.अं.वि.महा.मुंबई व 5 लाख  नंतर NSHFDC

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

फेम इंडिया स्कीम माहिती

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे फायदे

 • दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकरींना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मजबुत करून त्यांना स्वावलंबी करण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.
 • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा परत फेडीचा कालावधी हा 5 वर्षे आहे.
 • या योजनेमुळे आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच व्यवसायात वाढ करता यावी म्हणून कोणाकडेही उसने पैसे मागण्याची गरज पडणार नाही.
 • या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकरी हे शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
 • या योजनेमुळे शेती क्षेत्राचा विकास होईल.त्यामुळे दिव्यांग शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना पात्रता व अटी

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा दिव्यांग असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील दिव्यांग शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • प्रकल्पाची मर्यादा ही 10 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.

सन्मान धन योजना घरेलू कामगार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज अर्ज 2/3 प्रती मध्ये खालील साक्षांकित सत्यप्रत कागदपत्रासह
 • 15 वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्रात वास्तव्य केल्या बाबतचा दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र तहसीलदार प्रमाणित
 • वयाचा / शाळा सोडल्याचा दाखला
 • अपंगत्व प्रमाणपत्र सिव्हील सर्जन प्रमाणित
 • अनुभव प्रमाणपत्र अपव्यय जोडावा
 • आधार कार्ड
 • मतदान ओळखपत्र
 • 3/2 पासपोर्ट व पूर्ण आकाराचे फोटो
 • अर्जदाराच्या नावे जमीन/ शेती असण्याबाबत चा पुरावा ( 7/12 व 8अ चा उतारा )
 • व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थान चा नाहरकत दाखला (उदा ग़्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद) सचिव /मुख्याधिकारी द्वारा प्रमाणित)
 • व्यवसाय प्रकल्प अहवाल व दरपत्रक (Project Report and Quotation)
 • कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र 100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर
 • पाण्याची पातळी उपलब्धतेबाबतचा भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (विहीर, बोअरवेल, मोटर पाईपलाईन) या करिता

वैधानिक कागदपत्रे

 • स्थळ पाहणी
 • जमीनदार वैयक्तिक माहिती
 • पैसे दिल्याची पावती
 • डी. पी. नोट
 • प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे 100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
 • जमीन करारनामा (100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
 • तारण करारनामा (100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे.

 • दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील या योजनेच्या अधिकृत कार्यालयात जायचे आहे.
 • यानंतर कार्यालयातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • यानंतर कार्यालयातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरून सोबत सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
 • यानंतर भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना

प्रधानमंत्री शौचालय योजना

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर संपर्क / हेल्पलाईन नंबर

मुख्य नोंदणीकृत कार्यालय :

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या.

मुंबई ऑफिस नं. 74, तळमजला, गृह निर्माण भवन (म्हाडा),

कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051

दूरध्वनी : 022-26591620 / 26591622

ई-मेल आयडी : mshfdc@rediffmail.com / md.mshfdc@maharashtra.gov.in

अधिकृत वेबसाईट : www.mshfdc.co.in

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना FAQ

प्रश्न : दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना चे लाभार्थी कोण ?

उत्तर : महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकरी.

प्रश्न : दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेत प्रकल्प मर्यादा किती आहे?

उत्तर : दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेत प्रकल्प मर्यादा हि रुपये 10 लाख पर्यंत आहे.

प्रश्न : दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेत कर्जाचा वार्षिक व्याजदर काय आहे ?

उत्तर : 5 लाखापर्यंत व्याजदर हा पुरुषांसाठी 6% तर महिलांसाठी 5% असेल त्यानंतर 5 लाखांच्या पुढे पुरुषांसाठी व महिलांसाठी व्याजदर हा 7% असेल.

शासनाच्या इतर योजना :

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

श्रावण बाळ योजना माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना