किशोरी शक्ती योजना 2024 मराठी | Maharashtra Kishori Shakti Yojana

Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | किशोरी शक्ती योजना मराठी | Maharashtra Kishori Shakti Yojana Application Form | किशोरी शक्ती योजना लाभ, पात्रता, आणि अर्ज करण्याची पद्धत | किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र | किशोरी शक्ती योजना अर्ज | काय आहे किशोरी योजना

 

किशोरवयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून दुरावलेल्या मुलींना स्वत:ची काळजी कशी घ्यायची, शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे, प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर कसे उभे राहावे, यासाठी राज्य सरकारने किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील मुलींना शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रांतून दिले जाणार आहे.

तर मग चला मित्रांनो जाणून घेऊया कि महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना 2024 काय आहे? पात्रता काय आहे ? उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये काय आहे? याशिवाय, या योजनेशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती मराठी

आपल्या राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना आणली आहे. या योजनेंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील ज्या किशोरवयीन मुलींनी शाळा किंवा महाविद्यालय सोडले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून दुरावलेल्या मुलींना स्वत:ची काळजी कशी घ्यायची, शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे, प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर कसे उभे राहावे, यासाठी राज्य सरकारने किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे किशोरवयीन मुलींना शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ही योजना केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेंतर्गत एक घटक म्हणून राबविण्यात येत असलेल्या आधीच अस्तित्वात असलेल्या किशोरवयीन मुली (AG) योजनेची पुनर्रचना आहे. योजनेद्वारे 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींची पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे, त्यांना घरगुती आणि व्यवसायाभिमुख व्यवसायांमध्ये प्रशिक्षण देऊन पैसे कमविण्यास सक्षम करणे, संवेदनशील करणे त्यांना आरोग्य, पोषण, कौटुंबिक कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, वैयक्तिक आणि अतिपरिचित स्वच्छता यावर प्रशिक्षण देणे, बालविवाह प्रतिबंधित करणे. किशोरवयीन मुलींना त्यांच्या निर्णयक्षमतेची क्षमता वाढवण्यासाठी अनौपचारिक शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रांतून दिले जाणार आहे. ज्यासाठी राज्य सरकार प्रत्येक किशोरवयीन मुलीवर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करणार आहे. या योजनेचे संपूर्ण कामकाज राज्य सरकारच्या देखरेखीखालील महिला व बालविकास विभागामार्फत केले जाणार आहे.

किशोरी शक्ती योजना 2024 मराठी | Maharashtra Kishori Shakti Yojana

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना 2024 Highlights 

योजनेचे नाव किशोरी शक्ती योजना
कोणा व्दारा सुरुवात महाराष्ट्र सरकार
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील किशोरवयीन मुली
उद्देश्य राज्यातील किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण करणे
विभाग महिला आणि बाल विकास मंत्रालय
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट अद्याप उपलब्ध नाही

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

कन्यादान योजना महाराष्ट्र

किशोरी शक्ति योजनेचे उद्दिष्ट

 • किशोरी शक्ति योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींच्या हितासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
 • किशोरी शक्ति योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचे पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे. तसेच घरगुती व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्याना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण,बाल संगोपन,गृह व्यवस्थापन,व्यक्तिगत व परिसर स्वच्छता इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देऊन त्यांना जागृत करणे व बालविवाहास प्रतिबंध करणे.
 • मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवणे व त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • किशोरवयीन मुलींची निर्णयक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अनौपचारिक शिक्षण देणे.

किशोरी शक्ती योजना 2024 महत्वपूर्ण मुद्दे 

 • महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना संपूर्णपणे महिला व बाळ विकास विभागाच्या देखरेखेखालील अंगणवाडी केंद्रातून चालवली जाईल.
 • या योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला किशोरवयीन मुलीचे वजन नियमितपणे करण्यात येते.तसेच मुलींच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते.
 • या योजनेंतर्गत लाभार्थी किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण स्वच्छता, सामुदायिक पोषण, मासिक पाळी स्वच्छता, गैरसमज, गर्भनिरोधक, बालविवाहाचे परिणाम आणि लैगिक अत्याचार अशावेळी कोणाची मदत घ्यावी याविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल.
 • एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध, महिलांचे कायदे आणि हक्क, विवाह कायदा आणि त्यांची माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना स्वावलंबी बनवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी या योजनेत मेंदी काढणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे, सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रशिक्षण, केक बनवणे, गृहोपयोगी उपकरणे दुरुस्ती इत्यादींचे प्रशिक्षण अंगणवाडीच्या मदतीने दिले जाते.
 • लाभार्थी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची तपासणी दर 3 महिन्यांनी अंगणवाडी केंद्रांवर केली जाईल, त्यासाठी त्यांची आरोग्य पत्रिका बनवली जाईल. त्यांची उंची, वजन, शरीराचे वस्तुमान इत्यादींची नोंद या कार्डमध्ये ठेवली जाईल.
 • या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून दरवर्षी 8 लाख कोटी रुपये दिले जाणार असून तू रक्कम जीवन कौशल्य शिक्षण, आरोग्य शिक्षण, माहिती शिक्षण आणि संप्रेषण, आरोग्य कार्ड, संदर्भ आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रतिदिन ₹ 5 या दराने पोषण आहार यासारख्या सुविधा प्रदान करण्यासाठी खर्च केली जाईल.
 • महाराष्ट्र शासनाने ही योजना अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम या ठिकाणी सुरू केली आहे.

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्ये

 • किशोरी शक्ति योजनेची सुरुवात हि महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र सरकार कडून सुरु करण्यात आलेली किशोरी शक्ती योजना राज्यातील किशोवयीन मुलींसाठी हि एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
 • ही योजना 11 ते 18 वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील शाळा किंवा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या मुलींना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच घरगुती व व्यावसायिक जीवनातील प्रशिक्षण देऊन त्याना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनवणे.
 • महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 20 किशोरवयीन मुलींची निवड करून त्यांना विभागीय पर्यवेक्षण, ANM आणि अंगणवाडी सेविकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 • महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी स्तरावर आयोजित किशोरी आरोग्य शिबीर कार्यक्रमांत किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीची काळजी याबाबतचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच त्यांना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण दिले जाईल.
 • शाळा सोडणाऱ्यांना मुलींना घरगुती व्यवस्थापन, उत्तम स्वयंपाक ,स्वयंरोजगार आणि व्यवसाय प्रशिक्षण दिले जाईल व त्यासाठी त्यांना तयार केले जाईल.

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

pm सूर्य घर योजना माहिती

किशोरी शक्ती योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • दारिद्र्यरेषेखालील आणि गरीब व अनुसूचित जाती, जमाती, BPL कार्डधारक कुटुंबातील फक्त मुली अर्ज करण्यास पात्र आहेत.
 • 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
 • किशोरी शक्ती योजनेंतर्गत 6 महिन्यांसाठी किशोरवयीन मुलींची नियुक्ती केली जाईल.

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेचे फायदे काय आहेत?  

किशोरी शक्ति योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारे लाभ खालील प्रमाणे.

 • या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला किशोरवयीन मुलींचे वजन घेण्यात येते. व मुलींना पोषणविषयक माहिती दिली जाते.
 • किशोरी शक्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना शरीरासाठी लोह आणि फॉलिक ऍसिड का आवश्यक आहेत याबद्दल माहिती दिली जाते व मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या (IFA Tablet) दिल्या जातात.
 • योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींचे रक्त तपासून त्यात हिमोग्लोबिन ची मात्रा तपासली जाते.
 • फळ व हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्व सांगणे तसेच पोषण आणि आरोग्याशी संबंधित शिक्षण मिळते.
 • किशोरवयीन मुलींना प्रजनन क्षमता, वारंवार मुलांना जन्म दिल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगणे, मुलांची काळजी इत्यादी विषयांवरही मार्गदर्शन केले जाईल.
 • किशोरी शक्ती योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रातुन किशोरवयीन मुलींना आरोग्य कार्ड ही देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत शासनाकडून येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.या कार्डमध्ये त्यांची लांबी, त्यांचे वजन, त्यांचे शरीराचे वस्तुमान इत्यादी तपशील ठेवले जातील.
 • ज्या किशोरवयीन मुली त्यांचे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडत आहे अशा मुलींना या योजनेच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व समजावून त्यांना पुन्हा शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले जाईल.
 • योजनेअंतर्गत ज्या किशोरवयीन मुलींनी शिक्षण सोडले आहे अशा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व चांगल्या भविष्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून 1 लाखापर्यंत खर्च करण्यात येतो.
 • मुलींना किशोरवयीन वयात योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे 18 वर्षा नंतर त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते.
 • या योजनेमुळे मुलींचे मनोबळ वाढून त्यांना कोणावर अवलंबून ना राहता जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मुलींमध्ये निर्माण होण्यास मदत होते.

महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना नियम व अटी

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • गरीब, दारिद्र रेषेखालील,अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुली या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण सोडलेल्या किशोरवयीन मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.
 • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 11 ते 18 वर्ष वयोगटातील 20 किशोरवयीन मुलींची 6 महिन्याकरिता नियुक्त करण्यात येईल.
 • ग्रामीण, आदिवासी आणि नागरी प्रकल्पात मुलींची निवड हि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

किशोरी शक्ती योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

 • मुलीचे आधार कार्ड
 • मुलीचा जन्माचा दाखला
 • रेशन कार्ड ( BPL )
 • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला
 • शाळेचा दाखला
 • शालेय शिक्षण मार्कशीट
 • जातींचे प्रमाणपत्र
 • विज बिल
 • पासपोर्ट साईज फोटो
 • मोबाईल नंबर

किशोरी शक्ती योजना 2024 अर्ज करण्याची पद्धत

 • या योजनेच लाभ मिळविण्यासाठी अर्जदारांना जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा लागेल.
 • त्यानंतर योजनेचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी व सदर अर्ज अंगणवाडीत जमा करावा.
 • सदर अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलीची निवड करण्यात येईल.
 • तसेच किशोरी शक्ती योजनेअंतर्गत पात्र किशोरवयीन मुलींची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्रांशी संबंधित अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. व त्यानंतर किशोरवयीन मुलींची निवड केली जाईल.
 • योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या किशोरवयीन मुलींना किशोरी कार्ड सुद्धा मिळेल. ज्याद्वारे तिला या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ मिळू शकतील.

किशोरी शक्ती योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणतीही ऑनलाइन वेबसाईट सुरु केली नाही, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदारांनी वरीलप्रमाणे दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना

 प्रधानमंत्री शौचालय योजना

किशोरी शक्ती योजना FAQ 

प्रश्न : किशोरी शक्ती योजना काय आहे ?

उत्तर : महाराष्ट्र राज्यातील किशोरवयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “किशोरी शक्ती योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना शारीरिक, मानसिक, सामाजिक अनुभवाचे ज्ञान देऊन त्यांची निर्णयक्षमता वाढवली जाईल. या योजनेच्या अंतर्गत मुलींना पोषण, स्वच्छता, याबाबत प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर कसे उभे राहावे यासाठी जागरूक केले जाते.

ही योजना ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रांमार्फत राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत गरीब, दारिद्र रेषेखालील,अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुली त्याचप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण सोडलेल्या किशोरवयीन मुलींना अंगणवाडी केंद्रातून शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते.

प्रश्न : किशोरी शक्ती योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

उत्तर : महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब, दारिद्र रेषेखालील,अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुली त्याचप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण सोडलेल्या किशोरवयीन मुली किशोरी शक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

बाल विकास योजनेंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणासाठी किशोरी शक्ती योजना सन 2004  पासून सुरू आहे.

प्रश्न : किशोरी शक्ती योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा ?

उत्तर : किशोरी शक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

शासनाच्या इतर योजना :

SBI स्त्री शक्ती योजना

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना

महिला सम्मान बचत पत्र योजना

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना