कन्यादान योजना महाराष्ट्र 2024 मराठी : Maharashtra Kanyadan Yojana

Kanyadan Yojana Maharashtra । कन्यादान योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती मराठी । Mukhyamantri Kanyadan Yojana 2024 Kanyadan Yojana Maharashtra 2024 in Marathi | Kanyadan Yojana Maharashtra 2024: Application Form, Eligibility | महाराष्ट्र शासन कन्यादान योजना

 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी शासनाने महाराष्ट्र कन्यादान योजना या नावाने नवीन समाज कल्याण योजना सुरु केली आहे. हि योजना शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलीला महाराष्ट्र राज्य लग्न झाल्यावर तिला सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदत 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.

तर मग चला मित्रांनो आपण या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे कि अर्ज प्रक्रिया, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, योजनेशी संबंधित कागदपत्रे इत्यादी. माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

कन्यादान योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती मराठी

महाराष्ट्र कन्यादान योजना ही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे चालवली जाणारी एक समाज कल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आणि इतर मागासवर्गीय नागरिकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून 25,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. नवविवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे महाराष्ट्र कन्यादान योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

मुलींच्या लग्नादरम्यान कुटुंबांना आर्थिक समस्या भेडसावू नये व या अनुदान रकमेमुळे औपचारिक विधी, कपडे, दागिने आणि इतर पारंपारिक व्यवस्थेसह कुटुंबांना विवाह खर्च अधिक चांगल्या प्रकारे परवडतील आणि समुदायांचे एकूण सामाजिक-आर्थिक कल्याण वाढण्यास हातभार लागेल.

कन्यादान योजना महाराष्ट्र 2024 मराठी : Maharashtra Kanyadan Yojana

कन्यादान योजना महाराष्ट्र Highlights

योजनेचे नाव कन्यादान योजना
कोणा व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार
लाभार्थी अनुसूचित जाती/विमूक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग
योजनेचा उद्देश महाराष्ट्रात अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील जाती / जमातीतील लोंकाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे
आर्थिक मदत 25,000/- रुपये
अर्ज करण्याची पध्दत संबंधित स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज करणे
अधिकृत वेबसाइट https://sjsa.maharashtra.gov.in

 

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र मराठी

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

महाराष्ट्र कन्यादान योजनेचे उद्दिष्ट

 • योजनेचे प्राथमिक मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती, अनुसूचित जाती / जमाती, विमुक्त जाती, विशेष मागासवर्ग आणि आदिवासी कुटुंबातील मुलींच्या लग्न सोहळ्यात होणाऱ्या खर्चासाठी आर्थिक मदत करणे हे आहे.
 • सामुहिक विवाह सोहळ्यामध्‍ये सहभागी होऊन विवाह करण्यासाठी प्रवृत्त केले जाते जेणेकरून या कुटूंबांचे विवाहावर होणा-या अनाठाई खर्चावर नियंत्रण राहील

कन्यादान योजना लाभाचे स्वरुप (नवीन अपडेट)

महाराष्ट्रात अनुसुचित जाती (नवबौध्दांसह ) विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या जोडप्यांना रु 20000/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.पूर्वी ही रक्कम 10 हजार होती आणि ती वस्तू प्रकारात दिली जात होती म्हणजे नवविवाहित वधू-वरांना 6,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि 4,000 रुपये किमतीचे घरगुती साहित्य देण्यात येत होते. मात्र आता या रकमेचा धनादेश विवाह सोहळ्यानंतर मुलीच्या पालकांच्या नावे दिला जाणार आहे.

सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्या-या संस्था व संघटनांना प्रत्येक जोडप्या मागे रु 4000/- असे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. तसेच या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा महिलेस दुस-या विवाहाकरिता अनुज्ञेय आहे.

महाराष्ट्र कन्यादान योजनेचे फायदे

महाराष्ट्र कन्यादान योजनेचे लाभ पुढील प्रमाणे

 • अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी नवविवाहित जोडप्यांच्या पालकांना कन्यादान योजनेद्वारे 20,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
 • त्याचप्रमाणे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणा-या स्वयंसेवी संस्‍था व संघटांना प्रत्‍येकी जोडप्‍यामागे 4000/- रुपये एवढे प्रोत्‍साहनपर अनुदान शासनामार्फत देण्‍यात येते.

PM सूर्य घर योजना

कॅप्टिव्ह मार्केट योजना

महाराष्ट्र कन्यादान योजनेसाठी पात्रता

 • वधू आणि वर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
 • वराचे वय किमान 21 वर्ष आणि वधूचे वय 18 वर्षा पेक्षा कमी असू नये.
 • वधू आणि वरांपैकी एक किंवा दोन्ही जण हे अनुसूचित जातीचे, विमुक्त जातीचे किंवा इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
 • कन्यादान हे अनुदान फक्त वधू-वरांच्या प्रथम विवाहासाठीच दिले जाईल.
 • बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्‍या कोणत्‍याही कलमाचा भंगया दाम्‍पत्‍या/कुटूंब यांचेकडुन झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्‍यक आहे.
 • सामूहिक विवाह सोहळ्यात किमान 10 जोडप्यांनी विवाह समारंभ पार पाडणे आवश्यक आहे.
 • वधू किंवा वर यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा.

कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे     

 • विहित नमुन्यातील अर्ज
 • वधू – वर यांचे ओळखपत्र
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
 • विधवेच्या बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
 • बँक पासबुक
 • मोबाईल नंबर

फ्री शौचालय योजना

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप महाराष्ट्र

महाराष्ट्र कन्यादान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
 • अर्जामध्ये संबंधित डेटा आणि आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
 • त्याचबरोबर कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा. विवाहानंतर वधू-वर किंवा सामूहिक विवाह संस्था यांच्यामार्फत समाजकल्याण विभागाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला जातो व संबंधित जोडप्याना तसेच संस्थेला शासनाद्वारे अनुदान दिलं जात.

महाराष्ट्र कन्यादान योजना FAQ

प्रश्न : महाराष्ट्र कन्यादान योजना काय आहे?

उत्तर : कन्यादान योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे, जी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आणि इतर मागासवर्गीय नागरिकांना त्यांच्या मुलींच्या तसेच विधवा/घटस्फोटितांच्या लग्नासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेंतर्गत, पूर्वी गृहोपयोगी वस्तू आणि सामूहिक विवाह खर्चासाठी 10,000/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जात होते,मात्र आता ती रक्कम 25,000/- रुपये करण्यात आली आहे.

प्रश्न : महाराष्ट्र कन्यादान योजनेचे काय लाभ आहेत?

उत्तर : कन्यादान योजनेद्वारे भटक्या जमाती, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, विशेष मागासवर्ग आणि आदिवासीं समाजाच्या लाभार्थी नवविवाहित जोडप्यांच्या पालकांना 25,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

प्रश्न : महाराष्ट्र कन्यादान योजनेसाठी पात्रता काय आहे?

उत्तर : विवाहाच्या वेळी वधू आणि वर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर वराचे वय किमान 21 वर्षे आणि वधूचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

शासनाच्या इतर योजना :

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना मराठी

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना