डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2024 मराठी

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024  Apply Online | डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना | Maharashtra Dr. Panjabrao Deshmukh Hostel Maintenace Allowance Scheme Application Online at MahaDBT Portal | Maharashtra Sarkari Yojana 2024 | Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana 2024 Apply Online

 

महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ग्रामीण भागामधील अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत मजूर  अशा सर्व नागरिकांच्या गुणवंत व होतकरू विद्यार्थी मुलांसाठी ज्यांना व्यावसायिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होण्याचा आणि आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न करण्याचा उद्देश आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करतांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाव्दारे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राज्यामध्ये राबविण्यात आली आहे.

तर मग चला मित्रांनो आज आपण या लेखामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि या योजनेला लागणारी कागदपत्रे, पात्रता, योजनेमध्ये मिळणारा निर्वाह भत्ता त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज कसा करावा इत्यादी त्यामुळे जर तुम्हाला डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2024 संपूर्ण माहिती

ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार, मजूर यांच्या गुणवंत आणि होतकरू विद्यार्थी मुलांना नेहमीच शिक्षण घेतांना त्यांच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असण्याचा त्रास होतो. आर्थिक अडचणीमुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत नाहि आर्थिक परिस्थितीमुळे प्रतिभावान व गुणवान असून सुद्धा त्यांना उच्च शिक्षण सोडून द्यावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या समोर प्रश्न निर्माण होतो तो राहण्याचा, काही व्यावसायिक महाविद्यालयात वसतिगृहची सुविधा उपलब्ध असते तर काही ठिकाणी विद्यार्थ्याना स्वतः जागा घेऊन भाड्याने राहावे लागते.

अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार यांच्या मुलांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला शासकीय महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरु केली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचा उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत सरकारी अनुदानित, कॉर्पोरेशन किंवा खाजगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या निर्वाह साठी वार्षिक रु. 30,000 पर्यंतची आर्थिक मदत मिळेल .

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अंतर्गत मुंबई महानगर, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 3000/- रुपये तसेच या शहरांव्यतिरिक्त दुसऱ्या शहरांमध्ये अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2000/- रुपये दरमहिन्याला 10 महिन्यासाठी वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येईल.

या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांना शिष्यवृत्ती दिली जाते, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच अशासकीय अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित महाविद्यालये आणि बिगर कृषी विद्यापीठे आणि उपकेंद्रे (खाजगी विद्यापीठे वगळून / स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठे या शिष्यवृत्तीस पात्र आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2024 मराठी

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना Highlights

योजनेचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
कोणा द्वारा सुरु महाराष्ट्र सरकार
लाभार्थी आर्थिक दुर्बल घटकातील अल्प भूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार कुटुंबातील विद्यार्थी
उद्देश्य गुणवंत व होतकरू ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शक्षण पूर्ण करता यावे यासाठी आर्थिक सहाय्य करणे
आर्थिक मदत दरमहा 3000/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट https://mahadbtmahait.gov.in

 

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2024 उद्देश

 • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार यांच्या गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
 • शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विधार्त्यांच्या वसतिगृहाच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे.
 • राज्यातील आर्थिकदृष्टया गरीब, अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करून शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे.
 • उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे वैशिष्ट्य

 • महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
 • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते.
 • 1 लाख रुपये ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या 500 निश्चित करण्यात आलेली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आवश्यक  पात्रता व अटी

 • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे, या योजनेसाठी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी कामगार नोंदणी प्रमाणपत्र, जमीन नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थ्याने शासकीय खाजगी किंवा नियम शासकीय वस्तीग्रह मध्ये प्रवेश घेतला असल्यास, त्या विद्यार्थ्याने त्याबाबतचा पुरावा हा अर्जासोबत सादर करणे हे आवश्यक आहे.
 • लाभार्थी विद्यार्थ्याने खाजगी मालकीच्या घरामध्ये स्वत:ची राहण्याची सोय केली असल्यास अशा विद्यार्थ्यास नोटराईज्ड भाडे करार प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
 • ज्या विधार्त्याला अन्य कोणत्याही दुसऱ्या निर्वाह भत्ता योजनेंतर्गत निर्वाह भत्ता मिळत असेलअसा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
 • या योजनेंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील 2 मुले या वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
 • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये ते 8 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे, अर्ज करतांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत रुपये 1 लाख रुपये पर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाहभत्ता लाभ देण्याकरिता संख्येची कोणतीही मर्यादा राहणार नाही. मात्र 1 लाख रुपये ते 8 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाला करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या ही 500 इतकीच निश्चित केली गेलेली आहे.
 • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत 33% इतक्या जागा विद्यार्थिनी करता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता उपयोगात आणल्या जातील.
 • राजश्री शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजनेमध्ये पात्र असलेले विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
 • या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये दोन वर्षाची गॅप घेऊन पुढील अभ्यासक्रम करत आहेत अश्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • अर्जदार विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षात किमान 50 टक्के उपस्थिती किंवा त्याहून अधिक असल्याची खात्री करून द्यावी लागेल.
 • प्रत्येक जिल्ह्यातील कोटा हा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निश्चित करण्यात येईल.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना

किशोरी शक्ती योजना माहिती

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजने अंतर्गत लाभ

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेअंतर्गत लाभाचे स्वरूप पुढील प्रमाणे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांना महानगरासाठी निर्वाह भत्ता 3000/-रुपये दर महिन्याला जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी देय राहील, तसेच इतर शहरांसाठी 2000/- रुपये दर महिन्याला जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता देण्यात येतो.

तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर नाहीत,परंतु अशा कुटुंबातील विद्यार्थी ज्या कुटुंबातील पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 10,000/- रुपये दर महिन्याला जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2024 मराठी

त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. त्या विद्यार्थ्यांचे पालक जर अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार नाहीत, परंतु त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा  विद्यार्थ्यांना महानगर क्षेत्रासाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर शहरी क्षेत्रांसाठी व ग्रामीणभागांसाठी 8000/- रुपये 10 महिन्यांसाठी या प्रमाणे वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदार विद्यार्थ्याच्या पालकांचे अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असल्याचे प्रमाणपत्र
 • कुटुंबाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र)
 • ज्या विद्यार्थ्यांनी CAP प्रणालीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांनी CAP सबंधित कागदपत्र सादर करणे आवश्यक असेल.
 • गॅप संबंधित कागदपत्रे (गॅप असल्यास)
 • अर्जदार विद्यार्थी वसतिगृह दस्तऐवज खाजगी वसतिगृहत किंवा पेइंग गेस्ट राहत असल्यास मालकाशी करार करणे व तसे करार प्रमाणपत्र सादर आवश्यक असेल.
 • दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र (लाभार्थी 2 मुले असल्यास)
 • अधिवास प्रमाणपत्र
 • अर्जदार विद्यार्थ्याचे आधार कार्ड
 • अर्जदार विद्यार्थ्याचे रेशन कार्ड

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

कन्यादान योजना महाराष्ट्र

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

 • या योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • त्यानंतर या होम पेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय निवडावा लागेल.
 • या नंतर तुम्हाला नोंदणी आधार कार्डव्दारे करावी लागेल.
 • तुमच्याकडे आधार क्रमांक आहे का या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, होय किंवा नाही असे दोन पर्याय दिसतील त्यामधील होय  पर्याय निवडून क्लिक करावे, आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला ऑथेंटीकेशन प्रकार निवडावा लागेल, त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक असेल तर OTP निवडा आणि मोबाइल नंबर आधार कार्ड बरोबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक पद्धत हा पर्याय निवडा.
 • त्यानंतर तुमची सर्व माहिती पोर्टलवर प्रविष्ट करावी लागेल त्यासाठी घोषणा बॉक्सवर क्लिक करा, यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक OTP प्राप्त होईल.
 • तुम्हाला प्राप्त झालेला OTP नोंदणी फॉर्म मध्ये प्रविष्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला सुरु ठेवा बटनावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला तुमचे युजरनेम प्रविष्ट करावे लागेल आणि त्यानंतर पासवर्ड तयार करावा लागेल.त्यानंतर पासवर्ड व कॅप्चा कोड भरून नोंदणी बटनावर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे प्रक्रिया केल्यावर तुमची या ऑनलाईन पोर्टलवर यशस्वीरीत्या नोंदणी होईल.
 • शासनाच्या या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर तुम्हाला पोर्टलवर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल.
 • यानंतर तुम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करू शकता, यासाठी नोंदणीकृत अर्जदाराला ‘’अर्जदार लॉगिन’’ वर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड तसेच कॅप्चा कोड प्रविष्ट करून हि प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, यानंतर तुम्हाला ‘’Login Here’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • पोर्टवर लॉगिन झाल्यावर तुम्हाला ‘’योजना माहिती’’ या पर्यायावर क्लिक करून विभाग या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर ’उच्च आणि तांत्रिक शिक्षण’या पर्यायावर क्लिक करावे.
 • शिष्यवृत्ती योजनांची लिस्ट उघडेल यातील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करून, अर्जदाराला डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेमध्ये प्रविष्ट होता येईल, आता योजन पाहण्यासाठी ‘’पहा’’ या बटनावर करावे लागेल.
 • त्यानंतर अर्ज करा’’ हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे लागेल यानंतर ‘’अर्ज तपशील’’ विभागामध्ये अर्जदाराला स्वतः बद्दल अचूक माहिती भरावी लागेल.
 • त्यानंतर या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व प्रमाणपत्र इत्यादी माहिती अपलोड करावी लागेल, यानंतर तुमच्या घराचा कायमचा पत्ता भरून ‘’Save आणि Next’’ वर क्लिक करा.
 • यानंतर अर्जाचा पुढील विभाग अभ्यासक्रम आणि शिक्षणा सबंधित आहे या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती भरावी लागेल.
 • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना हेल्पलाईन नंबर

हेल्पलाईन नंबर : 022 – 49150800

निष्कर्ष:

महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवून विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. मित्रांनो या लेखामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही आपल्याला या योजनेबद्दल आणखी माहिती जाणून घायची असल्यास  या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट देऊ शकता.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना FAQ

प्रश्न : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे ?

उत्तर : महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल आणि अल्प भूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून येऊन, वसतिगृहात राहून त्यांचे व्यावसायिक उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृहसाठी दरमहा 3000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.

प्रश्न : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अंतर्गत बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना किती शिष्यवृत्ती मिळते ?

उत्तर : या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपया पर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 2000/- रुपये 10 महिन्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येतो.

प्रश्न : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना Last Date काय आहे?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 31 मार्च 2024 आहे.

प्रश्न : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

शासनाच्या इतर योजना :

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

प्रधानमंत्री शौचालय योजना