About Us

नमस्कार मित्रानो मी सिद्धेश आलिम राहणार ठाणे.


मला वाचनाची खुप आवड आहे. त्यामुळे मी माझ्या मोकळ्या वेळेत नव-नवीन पुस्तकांचे वाचन करतो. वाचनामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडते. व फ्रेशनेसची फिलिंग हि जाणवते.


एक दिवशी असेच वाचन करत असताना असे आढळून आले की महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकार आपल्या राज्यातील गरीब जनतेसाठी तसेच शेतकरी बांधवांसाठी शेतीशी निगडित असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी खुप योजना घेऊन येतात ज्या त्यांच्यासाठी खुप फायद्याच्या असतात. परंतु या योजनांची माहिती कुणालाच नसते, कारण त्यांना या योजनांबद्दल सांगणार कोणीच नसत त्यामुळे नवनवीन योजना येतात व निघून जातात व त्यामुळे लोकं या योजनांपासून वंचित राहतात. व त्यांना या योजनांचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे माझ्या मनात एक कल्पना सुचली की ज्या नवनवीन योजना केंद्र आणि राज्य शासन राबवतात त्या सर्वांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून मी ज्ञानसागर DS ही वेबसाईट बनवायचा निर्णय घेतला. जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील जनतेला या योजनांबद्दल माहिती देता येईल. आता सोशल मीडिया आणि ऑनलाईनच्या युगात सर्वांकडे मोबाईल उपलब्ध आहे त्यामुळे या वेबसाईट च्या माध्यमातून मला सर्व माहिती घरो-घरी देता येईल.


आमचा एवढाच प्रयत्न आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य माणसाला व शेतकऱ्याला संबंधित योजनांची, आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच कर्ज योजनांची माहिती मिळावी. जेणेकरून ते या योजनांचा लाभ घेऊन त्यांचे राहणीमान सुधारू शकतील तसेच शेतकरी आधुनिक शेती करून एक प्रगत शेतकरी होऊ शकेल.


तुम्ही सुद्धा या योजनांचा लाभ घ्या व तुमच्या जवळच्या लोकांना या योजनांबद्दल माहिती द्या व फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर वर शेअर करा जेणेकरून एखाद्या सामान्य माणसाला किंवा गरजू शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
धन्यवाद…